नासाची महिला क्रिस्टीना अंतराळवीर नवीन विक्रम करण्यास सज्ज

नासाची अंतराळवीर महिला क्रिस्टीना अंतराळात ३२८ दिवस वास्तव्यास राहण्याचा नवीन विक्रम तयार करण्यास सज्ज

Mumbai

नासाची अंतराळवीर महिला क्रिस्टीना कोचच्या अंतराळ मोहीमेच्या कालावधीत स्पेसवॉक करणार असून अंतराळात ३२८ दिवस वास्तव्यास राहण्याचा नवीन विक्रम तयार करण्यास सज्ज झाली आहे. आता पर्यंत अंतराळात सर्वात जास्त वेळ राहिलेल्या महिलांपैकी हा सर्वाधिक कालावधी असेल.

क्रिस्टीना १४ मार्च रोजी अंतराळ क्षेत्रात पोहचली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२० पर्यंत अवकाशात राहणार आहे. यापुर्वी २०१६-२०१७ मध्ये अंतराळवीर पैगी व्हिट्सनने २८८ दिवस अंतराळ क्षेत्रात राहण्याचा विक्रम तयार केला होता. पुरूष अंतराळवीर मधील स्कॉट केलीने अंतराळात सर्वात जास्त ३४० दिवस वास्तव्य केले होते. स्कॉट केलीने हा विक्रम २०१५-२०१६ मध्ये रचला होता.

नासा आणि त्यांच्या आयएसएस सहकाऱ्यांनी भविष्यासाठी नवं वेळापत्रक आणि नवीन क्रूसाठी वेळापत्रक तयार केले आहे, त्यानुसार नासाचे अंतराळवीर जेसिका मेयर पहिल्या अंतराळातील प्रवास करण्यास जाणार असून नासाचे अंतराळवीर एंड्रू मोर्गनच्या प्रवासाचा अवधी वाढला जाईल.