घरताज्या घडामोडीमोदी असंवेदनशील तर अनुपम खेर मनोरुग्ण; नसीरुद्दीन शहा यांची टीका

मोदी असंवेदनशील तर अनुपम खेर मनोरुग्ण; नसीरुद्दीन शहा यांची टीका

Subscribe

ज्येष्ठ नेते नसीरुद्दीन शहा यांनी नागरिकत्व सुधारित कायद्याविरोधातील वादात उडी घेतली आहे. त्यांनी नरेंद्र मोदी आणि अनुपम खेर यांच्यावर निशाणा साधला आहे.

नागरिकत्व सुधारित कायद्याविरोधात देशाभरात हिंसाचाराचा आगडोंब उसळला होता. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सर्व स्तरातून टिका केली जात होती. आता याचं पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी एका वेबसाईटला मुलाखत देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता अनुपम खेर आणि सीएए विरोधातील न बोलणाऱ्या बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या असंवेदनशील तर अनुपम खेर यांना जोकर आणि एकप्रकारचा मनोरुग्ण असल्याचं नसीररुद्दीन शहांनी म्हटलं आहे. तर अभिनेत्री दीपिका पदुकोणचं कौतुक केलं आहे. याशिवाय ते असं म्हणाले की, ‘७० वर्षे मी भारतात राहिल्यानंतरही या देशाचा नागरिक आहे हे सिद्ध होऊ शकत नसेल तर दुसऱ्या कोणत्या पुराव्याने ते सिद्ध होणार आहे, हा मला पडलेला प्रश्न आहे. सध्याच्या परिस्थितीबाबत मला विचारालं तर मी कोणालाही घाबरत नाही आणि मी अस्वस्थही नाही फक्त मला प्रचंड चीड आली आहे’

अनुपम हा एक प्रकारचा मनोरुग्ण 

विद्यार्थी तसंच बुद्धिजीवी वर्गाप्रती मोदी फारच असंवेदनशीलपणा दाखवत आहेत. ते कदाचित विद्यार्थी दशेतून गेले नसल्यामुळे ते असं वागत असल्याचं नसीरुद्दीन शहा म्हणाले. तसंच अनुपम खेर या मुद्दयाबाबत फारच पुढाकार घेताना दिसत आहे. माझ्या मते त्याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. तो एनएसडी आणि एनएफटीआयआयच्या काळापासून तो एक जोकर असून तो आताही तसाच आहे. त्या काळातील सर्वच सहकाऱ्यांना माहित आहे की, अनुपम हा एक प्रकारचा मनोरुग्ण आहे. हा गुण त्याच्या रक्तातच आहे, अशाप्रकारे नसीर यांनी अनुपम खेर यांच्यावर ताशेरे उडवले.

- Advertisement -

सुपरस्टार्स यांनी पाळलेल्या मौनाबाबत मला आश्चर्य वाटतं नाही

ते पुढे म्हणाले की, जे लोक या कायद्याला समर्थन करत आहेत त्यांनी आपण कशाचे समर्थन करत आहोत याचा विचार करणं गरजेचं आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि दिग्दर्शकांनी या कायद्या विरोधात उभे राहिले. मात्र अनेक सुपरस्टार्स यांनी याबाबत मौन पाळलं. याचं मला आश्चर्य वाटतं नाही. आपण जर याला विरोध केला तर आपल्याला बरेच काही गमवावे लागेल अशी भीती त्यांच्या मनात असेल.

दीपिकाने कसलीही भीती न बाळगता विद्यार्थ्यांना साथ दिली.

मात्र या सर्वांमध्ये दीपिकाचे फार कौतुक वाटतं. तिने कशाचीही भीती न बाळगता विद्यार्थ्यांना साथ दिली आणि विद्यार्थ्यांवरील होणाऱ्या अत्याचाराविरोधात उभी राहिली, अशाप्रकारे त्यांनी दीपिकाची स्तुती केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Video: बाबा जॅक्सन आणि वरुणचा मुकाबला व्हायरल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -