घरदेश-विदेशकाँग्रेसच्या पाचव्या यादीत ५६ उमेदवारांची नावं जाहीर

काँग्रेसच्या पाचव्या यादीत ५६ उमेदवारांची नावं जाहीर

Subscribe

लोकसभा निवडणुकीसाठीची पाचवी यादी काँग्रेस पक्षाने रात्री जाहीर केली असून ओडीसा मधील विधानसभेच्या ३६ उमेदवारांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची उमेदवारांची पाचवी यादी काँग्रेस पक्षाने रात्री जाहीर केली आहे. तर आोडिसा विधानसभेच्या काही उमेदवारांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठीच्या काँग्रेस पक्षाच्या पाचव्या यादीत एकूण ५६ उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम, ओडिशा आणि लक्षद्विप या सात राज्यांमधील उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान, याआधी सात मार्चला जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत १५, तर १३ मार्चला जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीत २१, तसेच तिसऱ्या यादीत १८, तर रविवार १७ मार्चला जाहीर करण्यात आलेल्या चौथ्या यादीत २७ लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. आतापर्यंत जाहीर झालेल्या या पाच याद्यामधुन कॉंग्रेसच्या एकूण १३७ उमेदवारांची लोकसभेसाठीची उमेदवारी निश्चित झाली आहे.

- Advertisement -

या राज्यांमधील उमेदवार

सोमवार १७ मार्चला जाहीर करण्यात आलेल्या या पाचव्या यादीत आंध्र प्रदेशमधील २२, आसामच्या पाच, ओडिशाच्या सहा, तेलंगणाच्या आठ, उत्तर प्रदेश मधील तीन, पश्चिम बंगालमधील ११ आणि लक्षद्विपमधील एक अश्या एकूण ५६ उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहेत. दरम्यान, या यादीत जंगीपूर मतदारसंघातून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजित मुखर्जी यांना उमेवारी देण्यात आली आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या पाच याद्यामध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर मधून नाना पाटोले, मुंबई उत्तर मतदारसंघातून प्रिया दत्त, दक्षिण मुंबईमधून मिलिंद देवरा, सोलपूरातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे तर गडचिरोलीत नामदेव मुसंडी यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

ओडिशा विधानसभेची यादी जाहीर

लोकसभेच्या पाचव्या यादी सोभतच ओडिशा विधानसभेच्या उमेदवारांची यादी देखील काँग्रेसने जाहीर केली आहे. यात ३६ उमेदवारांचा समावेश आहे. ओडीशा राज्यात लोकसभेच्या एकूण २१ जागा आहेत. तर विधानसभेच्या एकूण १४७ जागा आहेत.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -