घरताज्या घडामोडीबिल भरले नाही म्हणून डॉक्टरलाच कोंडले!

बिल भरले नाही म्हणून डॉक्टरलाच कोंडले!

Subscribe

एका सरकारी महिला डॉक्टर सुलतानने एका खासगी रुग्णालयावर एका दिवसासाठी १.१५  लाख रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. सुलतान असं या डॉक्टरचं नाव आहे. सरकरी रूग्णालयात काम करणाऱ्या डॉ.सुलताना या एका खासगी रूग्णालयात दाखल होत्या. यावेळी त्यांना एका दिवसाचे दिड लाख रूपये बील देण्यात आले. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. त्यावेळी तीने हा आरोप केला आहे. तीला एका दिवसासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीने पैसे न भरल्याने तीला हॉस्पिटलमध्येच डांबून ठेवण्यात आले. असा आरोप तीने यावेळी केला आहे.

जेव्हा त्यांनी बिल भरले तेव्हाच त्यांना सोडण्यात आले. परंतु चादरघाटचे पोलिस निरीक्षक सतीश यांनी सांगितले की, त्यांनी रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले आहेत, महिला डॉक्टरला ओलीस ठेवले नाही. याप्रकरणी एकही गुन्हा दाखल केलेला नाही. रुग्णालयाचे अधीक्षक शंकर म्हणाले की, डॉ सुलताना न सांगता खासगी रुग्णालयात गेल्या. जर त्यांनी सांगितले असते तर त्यांच्यावर इथेच उपचार करता आले असते.

- Advertisement -

कोरोनाच्या भितीने आत्महत्या

तर दुसरूकडे हैद्राबादमध्ये मूळ पश्चिम बंगालचा रहिवासी असलेल्या ३४ वर्षीय व्यक्तीने कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी हुसेन सागर तलावात उडी मारली. राम गोपाळपेट पोलिस स्टेशनचे एसपी बाबू यांनी सांगितले की पश्चिम बंगालमधील ३४ वर्षीय वृद्धांनी हुसेन सागर तलावामध्ये उडी मारून आत्महत्या केली. एका आठवड्यापासून त्याच्यावर खासगी उपचार सुरू होते. कोविडची लक्षणे दिसू लागली, म्हणून डॉक्टरांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र त्याने आत्महत्या केली.


हे ही वाचा – लग्नाच्या दिवशी पार्लरमध्ये गेली वधू, प्रियकराने केली गळा आवळून हत्या!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -