घरदेश-विदेशLockDown: मुलाच्या मृत्यूनंतर पित्याने दिले नाही जेवण, पंचायतीने दिली शिक्षा!

LockDown: मुलाच्या मृत्यूनंतर पित्याने दिले नाही जेवण, पंचायतीने दिली शिक्षा!

Subscribe

अशा प्रकारानंतर हिच मानवता आहे का? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे.

बर्‍याच वेळा आपण विसरतो की समाजातील चालीरिती आणि परंपरा या लोकांसाठी बनवल्या जातात, मात्र लोक त्यांच्यासाठी नाही. मध्य प्रदेशात प्रथाच्या नावाखाली एक लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. मध्यप्रदेशातील एका व्यक्तीला त्याच्या मुलाच्या मृत्यूनंतर देण्यात येणारे जेवण देता आले नाही म्हणून त्याला शिक्षा देण्यात आली.

असा घडला प्रकार

हा प्रकार मध्य प्रदेशातील छतरपूर येथील आहे. शेतकरी बृजगोपाल पटेल यांच्या १५ वर्षाच्या मुलाचा ९ मार्च रोजी विहिरीत बुडून मृत्यू झाला. लॉकडाऊन असल्याने बृजगोपाल यांना आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर असणारे विधी तसेच मृत्यू भोजन देणे शक्य झाले नाही म्हणून गावच्या पंचायतीने त्याला समाजातून हकलवून दिले. इतकेच नाही तर त्याला गावातील सार्वजनिक विहिरीतून पाणी भरण्यास देखील पंचायतीने बंदी घातली आहे. आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे बृजगोपाल पटेल आधीच नाराज होते. लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशाला घरात रहावे लागत आहे. असे असताना आता पंचायतीने बृजगोपाल पटेल याला समाजातून बहिष्कृत केले आहे.

- Advertisement -

हा संपुर्ण प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचला असून एसडीओपी छतरपूर मनमोहन बघेल यांनी सांगितले की, लॉकडाऊन असल्याने तक्रारकर्त्याने राजनगरातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, त्यामुळे पंचायतने त्यांना हद्दपार केले. स्टेशन प्रभारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. वस्तुस्थितीची पडताळणी केल्यानंतर दोषींवर त्वरित कारवाई केली जाईल, असे देखील सांगण्यात येत आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे संपुर्ण देश नाही तर जग हतबल झाले आहे. या संसर्गाशी लढण्यासाठी आतापर्यंत कोणतेही औषध किंवा लस विकसित केलेली नाही. अशा परिस्थितीत लॉकडाऊनमुळे सरकारने सर्व प्रकारच्या उत्सवांवर बंदी घातली आहे. लोकांना एकत्र न येण्यास तसेच शारीरिक अंतर राखण्याचे निर्देशही दिले आहेत. अशा परिस्थितीत गावाच्या पंचायतीला बृजगोपाल पटेल यांच्या मुलाच्या मृत्यूनंतरचे जेवण द्यावे अशी अपेक्षा आहे. अशा प्रकारानंतर हिच मानवता आहे का? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -