घरCORONA UPDATECoronaVirus: मास्कपासून मिळणार सुटका? युनिव्हर्सिटीचे नवे संशोधन

CoronaVirus: मास्कपासून मिळणार सुटका? युनिव्हर्सिटीचे नवे संशोधन

Subscribe

कोरोना विषाणुच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी मास्क परिधान करणे हे आता बंधनकारक झाले आहे. मात्र आता मास्कपासून कायमची मुक्ती मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे. कोविड १९ च्या युद्धात मास्क परिधान केल्यामुळे अनेकांना श्वसनाचे त्रास उद्भवू लागण्याचे पाहायला मिळाले. यावर तोडगा म्हणून पंजाबच्या लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने आता आगळ्यावेगळ्या पद्धतीचा मास्क बनवला आहे. त्यांनी मल्टिपर्पज एल्गीवर बेतलेला रेस्पिरेटर ऑक्सिजेनो बनवला असून याच्या वापरामुळे मास्कपासून सुटका मिळण्याचा दावा त्यांनी केला आहे.

हेही वाचा – सरकारी कार्यालयांसाठी नवे नियम: तीन फुटांचं अंतर, मास्क अनिवार्य

- Advertisement -

रेस्पिरेटरचे वैशिष्ठ्य

युनिव्हर्सिटीतर्फे बनवण्यात आलेले हे प्रोडक्ट हवेतील ९९.०३ टक्के धोकादायक गॅस आणि पर्टिकुलेट मॅटरला न्यूट्रीलाइज करण्यास उपयुक्त ठरते. तसेच आजूबाजूच्या ऑक्सिजनला आत घेण्याची क्षमताही वाढवते. म्हणजेच दुषित हवा बाजूला सारून शुद्ध हवा शरीरात घेण्यात मदत करते. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, रेस्पिरेटरमध्ये एल्गीचा वापर केला जातो. त्यामध्ये असलेल्या मायक्रोब्स (सूक्ष्म जीवाणू) शोधून कार्बन हाय ऑक्साइड आणि इतर वायू प्रदुषणांना काढून केवळ ऑक्सिजन निर्मितीचे काम ते करते. त्यामुळे श्वसनासाठी घेण्यात येणारी हवा आणखी शुद्ध होते. रेस्पिरेटर प्रामुख्याने कोरोना संकटाच्या काळी अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी अधिक उपयुक्त ठरणारे आहे. ज्यांना सर्वाधिक काळासाठी मास्क परिधान करावे लागले. शिवाय ज्यांना श्वसनाचा त्रास होता, अशासाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो.

असे काम करते रेस्पिरेटर 

हे संशोधन युनिव्हर्सिटीतील बीटेकचे विद्यार्थी दीपक देब, अनंत कुमार राजपूत आणि मनीष कोटनी यांच्यासह प्रो. डॉ. जस्टिन सॅम्युल यांनी केले आहे. विद्यार्थ्यांच्या मते, एन-९५ हे मास्क प्रदुषण आणि मायक्रोब्सला शरीरात प्रवेश करू देत नाही. मात्र प्रदुषिक गॅस जसे कार्बन डाय ऑक्साइड, नायट्रोजन आणि सल्फर डाय ऑक्साइड, व्हीओसी, कार्बनमोनोऑक्साइड, डिसइन्फेक्टेड जसे क्लेंजरमधून निघालेली दुर्गंधी याला फिल्टर करू शकत नाही. सध्या हॉस्पिटलमध्ये एन-९५ मास्कचाच वापर होत आहे.

यासाठी रेस्पिरेटर उपयोगी ठरेल –

  • ऑक्सिजेनो त्याच्या चार लेव्हलमधून १० मायक्रोमीटरपासून ०.४४ मायक्रोमीटरपर्यंतचे पार्टिकल्सदेखील फिल्टर करू शकतं
  • यातील हेपा फिल्टर धुळकणांना अॅक्टिव्हेटेड कार्बन फिल्टर व्हीओसी तसेच दुर्गंधी, हानिकारक प्रदुषीत गॅस, पीपीएफई (टेफलॉन) यालाही ०.४४ मायक्रोमीटरपर्यंतच्या लहान पार्टिकल्सलाही फिल्टर करू शकतात.
  • याचे डिझाईन खुपच कलात्मक पद्धतीने बनवण्यात आले आहेत.
  • प्रामुख्याने दमा असलेल्यांसाठी शुद्ध हवा घेण्याकरता हे खुपच उपयुक्त ठरणार आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -