घरताज्या घडामोडीपहा : कोरोनाने बदलली जीवनशैली; ६८ दिवसानंतर देशामधील दृश्य

पहा : कोरोनाने बदलली जीवनशैली; ६८ दिवसानंतर देशामधील दृश्य

Subscribe

कोरोनाने जीवनशैली बदलली असून ६८ दिवसानंतर देशामधील दृश्य पहा.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता देशात लॉकडाऊन जाहिर करण्यात आले होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही घराबाहेर पडत नव्हते. मात्र, आता ६८ दिवस झाल्यानंतर काही राज्यांमध्ये नियम शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे देशातील परिस्थिती थोड्या प्रमाणात पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, सर्वच लोक आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेताना दिसत आहेत. तर बस स्थानक आणि रेल्वे स्थानकावर गर्दी देखील पाहायला मिळत आहे.

दरम्यान, देशातील काही राज्य सील करण्यात आले आहेत. त्यामुळे लोक काळजीत देखील दिसत आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी लोक सलूनमध्ये केस कापण्यासाठी गेल्याचे पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करुन पुन्हा देशातील नागरिक आपल्या कामासाठी सज्ज झाले आहेत.

- Advertisement -

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने १ जूनपासून २०० नवीन गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. या गाड्या सध्या कार्यरत असलेल्या १५ कामगार आणि एसी विशेष गाड्यांपेक्षा वेगळ्या असून या घोषणेनंतर रेल्वेने स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत तोंडाला मास्क लावून ट्रेनची वाट पाहताना दिसत आहे.

- Advertisement -

दिल्ली : गुरुग्राम येथे गाड्यांच्या लाबंच्या लांब रांगा लागल्या होत्या. प्रवाशांचे म्हणे आहे की, ‘राज्य सरकारने आम्हाला परवानगी दिली आहे. मात्र, प्रवाशांकडे पास नसल्याने त्यांना अडवले जात आहे.

महाराष्ट्र : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरुन उदयन एक्सप्रेस रवाना.

तमिळनाडू : तामिळनाडूमधील दक्षिण रेल्वे विभागाच्या सलेम रेल्वे विभागात आज दोन गाड्यांची कामे सुरू केली.

केरळ : तिरुअनंतपुरम सेंट्रल जन शताब्दी १९९ प्रवाशांना घेऊन रेल्वे स्थानकात दाखल झाली.

गुजरात : बससेवा सुरु करण्यात आली आहे. अहमदाबाद येथील दृश्य.

लखनऊ : लखनऊ स्थानकावर गोमती एक्सप्रेस रवाना झाली असून सर्व प्रवाशांचे रेल्वे स्थानकावर स्क्रिनिंग करण्यात आले.

पश्चिम बंगाल : सरकारच्या परवानगी नंतर धार्मिळ स्थळे उघडण्यात आली.

उत्तर प्रदेश : सलून, ब्यूटी पार्लर उघडले.

मुंबई : सायन येथील भाजी मार्केटच्या बाहेर ट्रॅफिक जाम.


हेही वाचा – अमेरिकन पोलिसांनी गांधीगिरीने जिंकलं; हिंसक जमावापुढे टेकले गुडघे, आंदोलकांनी घेतली गळाभेट!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -