सिद्धू पुन्हा वादात; ‘मिठी’ नंतर आता ‘फोटो’

गोपाल चावला या खलिस्तानी दहशतवाद्यासोबत फोटो काढून घेतल्याप्रकरणी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर देशभरातून टीकेची झोड उठली आहे.

Mumbai
Navjot Singh Sidhu Controversy, Poses With Sikh Militant Gopal Singh Chawla in Pakistan
सिद्धूंच्या उजव्या बाजूला- खलिस्तानी दहशतवादी गोपाल चावला

भारताचे माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू याचं एक नवं आणि वादग्रस्त प्रकरण समोर आलं आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्या शपथविधीला उपस्थित राहून, त्यांची गळाभेट घेतल्याप्रकणी सिद्धू यांच्यावर देशभरातून जोरदार टीका झाली होती. आता एका फोटोमुळे सिद्धू पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्या अडकण्याची शक्यता आहे. हा फोटो आहे खलिस्तानी दहशतवादी गोपाल चावला आणि नवज्योत सिंग सिद्धू यांचा. कर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिबला जोडणाऱ्या मार्गिकेच्या पायाभरणी कार्यक्रमात नवज्योत सिंग सिंद्धू उपस्थित होते. याच कार्यक्रमात खलिस्तानी दहशतवादी गोपाल चावलाही हजर असल्याचं या फोटोमधून समोर आलं आहे. सदर फोटोमध्ये सिद्धू आणि चावला एकमेकांच्या बाजूला उभे राहिल्याचं स्पष्ट दिसत असून, एका दहशतवाद्यासोबत फोटो काढून घेतल्याप्रकरणी सिद्दधू यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. हे छायाचित्र सध्या देशभरात व्हायरल होत असून, नवज्योत सिंग सिद्धू यांना राजीनामा द्यावा, अशी मागणी अकाली दल तसंच अन्य विरोधी पक्षांनी केली आहे. नवज्योत सिंग सिद्धू हे सध्या पंजाब सरकारमध्ये मंत्री म्हणून कार्यरक आहेत.

याच फोटोवरुन सिद्धूंवर विरोधकांची जोरदार टीका

पाकिस्तानमधील कर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिब हे नानकदेवांचे समाधीस्थळ आणि भारतातील गुरुदासपूर येथील डेरा बाबा नानक हे धार्मिक स्थळ, आपापसांत जोडण्यासाठी कर्तारपूर मार्गिका तयार करण्यात येत आहे. कर्तापूर मार्गिकेद्वारे भारत आणि पाकिस्तानमधील ही दोनही धार्मिक स्थळं जोडली जाणार आहेत. याचा मार्गिकेच्या पायाभरणीचा कार्यक्रम बुधवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये नवज्योसिंग सिद्धू, केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल आणि हरदीप सिंग पुरी हे भारताटं प्रतिनिधित्व करत होते. कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सिद्धू यांचे तोंजभरुन कौतुक केले. त्यामुळे हा मुद्दादेखील नवज्योत सिद्धूंसाठी अडचणीचा ठरला आहे. अशातच कार्यक्रमासाठी हजर असलेल्या खलिस्तानी दहशतवादी गोपाल चावला यांच्यासोबत फोटो काढल्यामुळे सिद्धू पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. या कार्यक्रमात पाकिस्तानातील दहशतवादी हाफिज सईद हादेखील हजर होता.

काय होते ‘मिठी’ प्रकरण?

पाकिस्तानाचे माजी क्रिकेटर इम्रान खान यांच्या शपथविधीला नवज्योत सिंग सिद्धुनं हजेरी लावली. इम्रान खान यांच्या शपथविधीला भारतातून गेलेला एकमेव पाहुणा म्हणजे नवज्योत सिंग सिद्धु. केवळ शपथविधी सोहळ्याला हजेरी लावून सिद्धु थांबला नाही. या सोहळ्यादरम्यान नवज्योत सिंग सिद्धुने पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची गळाभेट देखील घेतली होती. या प्रकरणामुळे भारतीवासीयांनी सिद्धूंना अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली होती.