‘सिद्धूजी शब्दाला जागा आणि राजकारण सोडा’

'राहुल गांधी अमेठीतून पराभूत झाले तर मी राजकारण सोडेल', असे नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले होते. आता राहुल गांधी यांच्या पराभवानंतर सोशल मीडियावर नेटीझन्सनी त्यांना राजकारण कधी सोडणार? असे प्रश्न विचारले आहेत.

Mumbai
navjot singh sidhu
नवज्योत सिंग सिद्धू

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत पंजाबचे राज्य मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धूंनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांना स्वत:ला पश्चाताप करावा लागत आहे. त्यामागील कारणही अगदी तसेच आहे. या निवडणुकीत नवज्योत यांनी काँग्रेसच्या बाजूने प्रचार केला. नवज्योत सिंग सिद्धूंनी २८ एप्रिल २०१९ रोजी रायबरेली येथे काँग्रेसच्या सोनिया गांधी यांच्या प्रचारसभेत ‘राहुल गांधी अमेठीतून निवडूण येणारच’, असा दावा केला होता. याशिवाय ‘जर राहुल गांधी अमेठीतून निवडूण नाही आले तर, मी राजकारण सोडणार’, असे वक्तव्य नवज्योत यांनी केले होते. याच वक्तव्यावरुन नेटीझन्सनी नवज्योत यांना घेरले आहे. राहुल गांधी यांचा अमेठीत पराभव झाल्यामुळे तुम्ही आता राजकारण सोडणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

‘लोकांनी सोनिया गांधी यांच्याकडून राष्ट्रवाद शिखावा’

नवज्योत सिंग यांना आत्मविश्वास होता राहुल गांधी जिंकून येणार आहेत. त्यामुळे ते प्रचारसभेत आत्मविश्वासाने बोलत होते. परंतु, त्यांचा हाच आत्मविश्वास त्यांना भारी पडला आहे. याशिवाय, या प्रचारसभेत नवज्योत यांनी सोनिया गांधी यांच्या बाबत स्तुतिसुमने केली होती. ते म्हणाले की, ‘रायबरेली मतदारसंघाच्या नागरिकांनी सोनिया गांधी यांच्याकडून राष्ट्रवाद शिकायला हवा. काँग्रेस काळात देशात सुई पासून जहाजपर्यंतच्या सगळ्या गोष्टी तयार व्हायच्या. परंतु, आता देशात या वस्तू तायर होत नाही.’

अमेठीत भाजपच्या स्मृती इराणी विजयी

उत्तर प्रदेशच्या अमेठी मतदारसंघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उमेदवारी लढवत होते. त्यांच्या विरोधात भाजपच्या स्मृती इराणी उमेदवारी लढवत होत्या. अखेर या मतदारसंघात स्मृती इराणी १४ हजार मतांनी विजयी झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here