घरदेश-विदेशनवज्योत सिंग सिद्धूची 'ती' मिठी आणि वाद

नवज्योत सिंग सिद्धूची ‘ती’ मिठी आणि वाद

Subscribe

नवज्योत सिंग सिद्धुनं पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांना मारलेल्या मिठीवरून मोठा वाद निर्माम झाला आहे.

मुर्दाबाद….मुर्दाबाद…नवज्योत सिंग सिद्धु मुर्दाबाद!! भारताचा माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धु विरोधात सध्या देशभरात मोठ्या प्रमाणात रोष पाहायाला मिळाला आहे. त्याला कारण देखील तसेच आहे. पाकिस्तानाचे माजी क्रिकेटर इम्रान खान यांच्या शपथविधीला नवज्योत सिंग सिद्धुनं हजेरी लावली. इम्रान खान यांच्या शपथविधीला भारतातून गेलेला एकमेव पाहुणा म्हणजे नवज्योत सिंग सिद्धु. केवळ शपथविधी सोहळ्याला हजेरी लावून सिद्धु थांबला नाही. या सोहळ्यादरम्यान नवज्योत सिंग सिद्धुने पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची गळाभेट देखील घेतली. त्यामुळे भारतीयांच्या तळपायाची आग मस्तकामध्ये गेली. शिवाय, पाक व्याप्त काश्मीरचे राष्ट्रपती मसूद खान यांच्या बाजुला देखील सिद्धु बसला. त्यामुळे भारतीयांच्या रागामध्ये आणखीनच भर पडली. जवान सीमेवर शहीद होतात आणि तुम्ही मिठ्ठ्या कसल्या मारता? असा संतप्त सवाल नवज्योत सिंग सिद्धु याला तमाम भारतीय विचारत आहेत.

गिरे तो भी टांग उपर

पण, भारतामध्ये परत येताच सिद्धुने बाजवा यांना मारलेल्या मिठ्ठीबद्दल स्पष्टीकरण देखील दिले. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांना मी नाही तर त्यांची मिठी मारली असा पवित्रा घेतला. शिवाय, आम्हाला शांती हवी असे बाजवा म्हणाल्याचे सिद्धुने म्हटले आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. रोज भारतीय जवान शहिद होत आहेत. त्यानंतर देखील पाकिस्तान आम्हाला शांती हवी असा म्हणते हे हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया आता पुढे येत आहे.

- Advertisement -

‘आप’चे देखील समर्थन

सिद्धु यांनी काहीही चुकीचे केले नाही असे आपचे खासदार भगवंत मान यांनी म्हटले आहे. त्यामुळे सिद्धुच्या समर्थनार्थ आता आप देखील मैदानात उतरली आहे.

अमरिंदर सिंग यांची टीका

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सिद्धुने बाजवा यांना मारलेल्या मिठीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सीमेवर जवान शहीद होत आहेत. पाकिस्तानच्या लष्कप्रमुखांच्या हातामध्ये या गोष्टी रोखणे शक्य आहे. त्यानंतर देखील सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. त्यामुळे सिद्धु यांची कृती समर्थनीय नाही असे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

भाजपची टीका

नवज्योत सिंग सिद्धुच्या कृतीवर भाजपने देखील टीका केली आहे. इकडे जवान शहीद होतात आणि तिकडे जाऊन पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना मिठ्ठ्या मारणं किती योग्य? असा सवाल भाजपचे प्रवक्ते संदीप पात्रा यांनी केला आहे. तसेच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आता यावर काहीच का बोलत नाहीत? असा सवाल देखील पात्रा यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -