नवनीत राणा यांची लोकसभेत विनंती; ‘आमचे वेतन घ्या, पण खासदार निधी कापू नका’

amravati mp navneet kaur rana tested corona positive
अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी खासदारांचे वेतन घ्या, पण खासदार निधी कापू नका, अशी विनंती आज, मंगळवारी लोकसभेत केली. संसदेचे विशेष पावसाळी अधिवेशन सुरू असून आज या अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. दरम्यान, पावसाळी अधिवेशनानिमित्त राजधानी दिल्लीत असलेल्या नवनीत राणा यांनी लोकसभेत बोलताना ही मागणी केली. कृपया आमचे (खासदारांचे) पगार घ्या, पण कृपा करुन मतदारसंघाच्या विकासासाठी दिला जाणाऱ्या निधीत कपात करु नका, अशी विनंती नवनीत कौर राणा यांनी केली. लोकसभेने संसदेच्या सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन (दुरुस्ती) विधेयक २०२० मंजूर केले. यावरील चर्चेदरम्यान नवनीत राणा यांनी मागणी केली. यानुसार खासदारांचे ३० टक्के वेतन पुढील वर्षभरासाठी कापले जाणार आहे.

काय म्हणाल्या खासदार नवनीत राणा 

माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी एकही शब्द न बोलणं म्हणजे त्या हल्ल्याचं समर्थन आहे, अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी केली होती. संवेदनाहीन मुख्यमंत्री याबाबत दिलगिरी सुद्धा व्यक्त करत नाहीत. हा संपूर्ण देशातील माजी सैनिकांचा अपमान आहे. या प्रकरणी लोकसभेत आवाज उचलणार आहे, असेही त्या म्हणाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना प्रत्यक्ष भेटून माजी सैनिकांची कैफियत मांडणार आहे. याबाबत न्याय मिळवून देऊ. देशातील कुठल्याही माजी सैनिकांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. गुंडप्रवृत्तीच्या हल्लेखोर शिवसैनिकांना कठोर शिक्षा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही.

हेही वाचा –

दिलासादायक! कोरोनावर मात करून बरे झालेल्या रूग्णांमध्ये भारत प्रथम स्थानी