घरदेश-विदेशनवाज शरीफ आणि मुलगी मरियमला होणार अटक?

नवाज शरीफ आणि मुलगी मरियमला होणार अटक?

Subscribe

पनामा पेपर्स घोटाळ्यानंतर देशाबाहेर असणारे नवाज शरीफ शुक्रवारी पाकिस्तानात परतत आहेत. पाकिस्तानात आल्यानंतरच त्यांना अटक करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांना शुक्रवारी अटक होण्याची शक्यता आहे. पनामा पेपर्स घोटाळ्यानंतर देशाबाहेर असणारे नवाज शरीफ आणि मुलगी मरियम शुक्रवारी पाकिस्तानात परतत आहेत. पाकिस्तानात आल्यानंतरच त्यांना अटक करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या दोघांच्या अटकेच्या बातमीनंतर संपूर्ण पाकिस्तान तणावाखाली आहे. ही तणावाची परिस्थिती लक्षात घेता प्रशासनानं नॅशनल अकाऊंटेबिलिटी ब्युरोकडून (नॅब) दोन हेलिकॉप्टरची व्यवस्था केली आहे. नवाज शरीफ आणि मरियम यांना एअरपोर्टवरूनच अटक करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

दोन हेलिकॉप्टरची केली व्यवस्था

पाकिस्तानच्या स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान प्रशासनानं इस्लमाबाद एअरपोर्टवर सुरक्षा वाढवली आहे. त्याचबरोबर इस्लमाबाद एअरपोर्टवर लँड करणाऱ्या फ्लाईट्सना लाहोरकडे वळवण्यात आलं आहे. नवाज शरीफ आणि मरियम यांना एअरपोर्टवरूनच अटक करता यावी यासाठी ही सुरक्षा पाळण्यात आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत हे दोघेही इस्लामाबादला पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्याचवेळी अटक होण्याची बातमी आहे.

- Advertisement -

नवाज शरीफचा पक्ष काढणार रॅली

एका बाजूला नवाज शरीफच्या अटकेची तयारी चालू असताना मात्र दुसऱ्या बाजूला त्यांचा राजकीय पक्ष पीएमएलएननं त्यांच्या स्वागतासाठी पंजाबमधील लाहोरमध्ये एका मोठ्या रॅलीचं आयोजन केलं आहे. देशातील तणावाची परिस्थिती आणि रॅली काढता येऊ नये यासाठी पाकिस्तानातील स्थानिक पोलिसांनी १०० पेक्षा जास्त नेते आणि कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

नवाजची पत्नी कोमामध्ये

एक महिन्यानंतर नुकतेच नवाज शरीफच्या पत्नीनं डोळे उघडले असून मरियमनं आपल्या इन्स्टावरून फोटो पोस्ट केले आहेत. आपल्या आईनं लवकर बरं व्हावं अशी इच्छा व्यक्त करून मुलं कितीही मोठी असली तरी ती लहानचं राहतात अशा स्वरुपाचं कॅप्शन देत तिनं निरोप घेतलेले फोटो पोस्ट केले आहेत.

- Advertisement -

 

कोर्टानं दिली १० वर्षाची शिक्षा

पाकिस्तानच्या भ्रष्टाचारविरोधी कोर्टानं माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांना भ्रष्टाचारी घोषित केलं असून अवनफील्ड रेफरन्श खटल्यात १० वर्षांची शिक्षा नवाज यांना आणि मरियमला ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -