घरदेश-विदेशझारखंडमध्ये नक्षलवादी चकमक; तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान

झारखंडमध्ये नक्षलवादी चकमक; तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान

Subscribe

झारखंडमध्ये तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. मात्र, या चकमकीत सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला आहे.

झारखंडमध्ये नक्षलवादी आणि केंद्रिय राखील दलाचे जवान यांच्यात चकमक उडाली. या चकमकीत तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. या नक्षवाद्यांकडे सापडलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. झारखंडच्या बेलभा घाट परिसरात ही चकमक सुरु होती. केंद्रिय राखीव दलाच्या ७ बटालियनकडून बेलभा घाट परिसरात स्पेशल ऑपरेशन सुरु होते. या ऑपरेशन दरम्यान नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. या चकमकीत केंद्रिय राखीव दलाचा एक जवान शहीद झाला आहे.

नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर

जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरु झाल्यावर जवानांनी नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यात एक जवान शहीद झाला. तर तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. या नक्षलवाद्यांकडे एक एके-४७ रायफल, ३ मॅगजिन्स आणि चार पाइप बॉम्ब इतका शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

नक्षलवाद्यांच्या कारवाईमध्ये वाढ

गेल्या काही दिवसांपासून नक्षलावाद्यांच्या कारवाईमध्ये वाढ झाली आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे गेल्या आठवड्यात नक्षलवाद्यांनी निवडणूक प्रचारावरुन परतणाऱ्या भाजपच्या ताफ्यावर भुसुरुंगचा स्फोट घडवून आणला होता. या स्फोटामध्ये दंतेवाडाचे भाजप आमदार भीमा मांडवी यांचा मृत्यू झाला होता. यासोबतच चार जवान शहीद झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -