घरदेश-विदेशछत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केली सपा नेत्याची हत्या

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केली सपा नेत्याची हत्या

Subscribe

बिजापूर पोलीस स्टेशनहून अवघ्या १५ किमी अंतरावर घडली घटना

छत्तीसगड येथील बिजापूर पोलीस स्टेशन पासून अवघ्या १५ किमी अंतरावर एक धक्कादायक घडली आहे. समाजवादी पक्षाचे नेते संतोष पुनेमा यांची धारदार शस्त्राने वार करून नक्षलवाद्यांनी हत्या केल्याचे समोर आले आहे. पुनेमा यांचा मृतदेह जप्त करण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झालं आहे.

बिजापूर जिल्हा समाजवादी पक्षाचे उपाध्यक्ष

संतोष पुनेमा हे मरिमल्ला गावचे रहिवाशी असून बिजापूर जिल्हा समाजवादी पक्षाचे उपाध्यक्ष होते. २०१८ मध्ये व्यवसायाने कंत्राटदार असलेल्या पुनेमांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती.

- Advertisement -

हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

मंगळवारी संध्याकाळी पुनेमा यांची मरिमल्ला येथील एका कन्सट्रक्शन साइटवरून अपहरण करण्यात आले. आज सकाळी येथील घनदाट जंगलामध्ये नक्षलवाद्यांनी त्यांची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहे. यापुर्वीही छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी बऱ्याच राजकीय नेत्यांच्या हत्या घडवून आणल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -