घरदेश-विदेशउद्या एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक; उद्धव ठाकरेदेखील राहणार उपस्थित

उद्या एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक; उद्धव ठाकरेदेखील राहणार उपस्थित

Subscribe

लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर उद्या, शनिवारी दिल्लीत एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला राज्यातील भाजपच्या नवनिर्वाचित खासदारांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी उपस्थित राहणार आहे. ही बैठक दुपारी २ वाजता दिल्लीत होणार आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी भाजप खासदारांची ही बैठक पार पडणार आहे. तर भाजप खासदारांसोबत एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांचीही बैठक होणार आहे. त्याकरता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी थोड्याच वेळापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी फोन करून चर्चा केली. उद्या संध्याकाळी दिल्लीत एनडीएच्या बैठकीसाठी त्यांनी आमंत्रण दिले. त्यामुळे उद्या एनडीएच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरेदेखील दिल्लीला जाणार आहेत. तर सोबत शिवसेनेचे खासदारही उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -