पाकिस्तानमधील सार्क परिषदेला मोदी जाणार नाहीत – स्वराज

पुढील वर्षी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार नाहीत अशी माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. कारण दहशतवाद आणि चर्चा या एकाच वेळी होऊ शकत नाहीत. पाकिस्ताननं पहिल्यांदा दहशतवादाला प्रोत्साहन देणं थांबवावं अशा स्पष्ट शब्दात सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे.

Delhi
भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज

पुढील वर्षी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार नाहीत अशी माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. कारण दहशतवाद आणि चर्चा या एकाच वेळी होऊ शकत नाहीत. पाकिस्ताननं पहिल्यांदा दहशतवादाला प्रोत्साहन देणं थांबवावं अशा स्पष्ट शब्दात सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे. नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे. पुढील वर्षी पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये सार्क परिषद होत आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र सहभागी होणार नाहीत असं सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे. दरम्यान, दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानची भूमिका दुटप्पी असल्याचं देखील स्वराज यांनी म्हटलं आहे. जोवर पाकिस्तान दहशतवादाचं समुळ उच्छाटन करत नाही तोवर पाकिस्तानशी चर्चा नको असं देखील यावेळी स्वराज यांनी म्हटलं आहे. कर्तारपूर मार्गासाठी भारत मागील अनेक वर्षापासून पाकिस्तानकडे पाठपुरावा करत आहे. पण, आता कुठे पाकिस्ताननं त्याला प्रतिसाद दिला. पण, याचा अर्थ भारत दहशतवादासारख्या मुद्याकडे दुर्लक्ष करेल आणि पाकिस्तानशी चर्चा करेल असा होत नाही असं देखील यावेळी स्वराज यांनी स्पष्ट केलं.

वाचा – पाकमधल्या निवडणुकीत सिद्धु जिंकतील – इम्नान खान

२०१६ साली झालेल्या उरी हल्ल्यानंतर भारतानं सार्क परिषदेवर बहिष्कार घातला होता. त्यामुळे सार्क परिषद रद्द झाली होती. आता पुन्हा एकदा भारतानं सार्क परिषदेवर बहिष्कार घातला आहे. दरम्यान, श्रीलंका, बांग्लादेश, भुतान आणि अफगणिस्ताननं देखील बहिष्कार टाकावा असं भारतानं म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी शपथविधी सोहळ्याला सार्क देशाच्या प्रतिनिधींना बोलावलं होतं. त्यावेळी पाकिस्ताननं तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी हजेरी लावली होती. शिवाय, नवाज शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला जात त्यांना शुभेच्छा देखील दिल्या होत्या. त्यामुळे भारत – पाकिस्तानमधील चर्चा सुरू झाली होती. पण, दहशतवादी कारवाया काही थांबल्या नाहीत. तसेच इम्नान खान यांनी देखील भारताशी संबंध सुधारण्यावर भर देऊ असं म्हटलं होतं. पण, दिवसेंदिवस दहशतवादी कारवाया वाढताना दिसत आहेत. त्यावर आता भारतानं कडकं पावलं उचलायला सुरूवात केली आहे.

वाचा – भारतासोबत आम्हाला चांगले संबंध अपेक्षित – इम्नान खान