घरदेश-विदेश'स्माईली'च्या जनकाला नेटिझन्सची अनोखी श्रद्धांजली

‘स्माईली’च्या जनकाला नेटिझन्सची अनोखी श्रद्धांजली

Subscribe

कलाकर हॉर्वे रॉस बॉल जरी या जगात नसले तरी त्‍यांनी बनविलेल्या स्‍माईली शिवाय कोणाचाच दिवस जात नाही. हार्वे बॉल यांनी निर्मिती केलेल्या स्माईलीची अनोखी कहाणी...

जगभरात करोडो लोकांच्या चेहऱ्यावर आनंद, हास्य आणणाऱ्या स्माईलीचे जनक म्हणून ओळखले जाणारे हार्वे बॉल यांचा आज स्मृती दिन. स्‍माईलीला रुप देण्‍याचे काम करणाऱ्या या कलाकाराचे १२ एप्रिल २००१ साली निधन झाले. कलाकर हॉर्वे रॉस बॉल जरी या जगात नसले तरी त्‍यांनी बनविलेल्या स्‍माईली शिवाय कोणाचाच दिवस जात नाही. हार्वे बॉल यांनी निर्मिती केलेल्या स्माईलीची अनोखी कहाणी…

- Advertisement -

सर्वसामान्य माणसांपासून सर्वच क्षेत्रातील मंडळींचा सध्या सोशल मीडियाचा वापर करणे हा अविभाज्य भाग आहे. सोशल मीडियातील व्‍हॅटस्ॲप , फेसबूक, इंस्‍टा, ट्‍वीटर यांवर एकमेकांशी संवाद साधताना अनेक मॅसेज आपल्याकडून पाठवले जातात. परंतु, त्यात आवर्जून वापरली जाणारी एक गोष्ट म्हणजे ईमोजी, स्माईली. या ईमोजी, स्माईलीचा वापर केल्याशिवाय मॅसेज परिपुर्ण होतच नाही. सोशल मीडियावर संवाद साधण्यासाठी शब्दांची जागा स्माईलीनेच घेतली असे म्हटले तरी अतिश्योक्ती वाटणार नाही. पण, या स्माईलीची निर्मिती झाली कशी? या विषयी थोडे…

- Advertisement -

तेव्हा झाला स्माईलीचा जन्म

हार्वे बॉल यांचा जन्म १० जुर्ले १९२१ मध्‍ये मेसाचुसेट्‍स येथे झाला. दुसर्‍या महायुद्‍धाच्‍यावेळी अशिया आणि पॅसिफिक यांच्‍याकडून हार्वे यांनी या युद्‍धात सहभाग घेतला होता. या सहभागाबद्दल त्‍यांना कास्‍यपदक देण्‍यात आले आहे. युद्‍ध संपल्‍यानंतर हार्वे यांनी हार्वे बॉल जाहिरात कंपनीची स्‍थापना केली. १९६३ मध्‍ये कंपनीने हार्वे यांना असे चित्र काढण्‍यास सांगितले, ज्‍याचा वापर बटनावर करण्‍यात येईल. त्‍याच्‍यवेळी हार्वे यांनी पिवळ्‍या रंगाच्‍या स्‍माईलिचे चित्र काढले. तेव्‍हापासून ते आजपर्यंत ‘ती’ स्‍माईली लोकांच्‍या हास्‍याचे कारण ठरत आहे.

१० मिनिटाची स्‍माईली जगाची लाडकी

त्‍यावेळी, त्‍यांना स्‍माईली बनविण्‍यासाठी ४५ डॉलर मिळाले होते. ही स्‍माईली बनविन्‍यासाठी हार्वे यांना फक्‍त १० मिनिटे लागले होते. १० मिनिटाची स्‍माईली आज जगभरात प्रसिद्‍ध झाली आहे. प्रत्‍येकाच्‍या मोबाईल फोनमध्‍ये या स्‍माईलीची जागा फिक्‍स आहे आणि तिचा वापरही सरास सगळे करताना दिसतात. स्‍माईलीचा अर्थ आहे की, समाजात उत्‍साह निर्माण करणे व आनंद निर्माण करणे पण सोशल मिडियाच्‍या जगात मात्र याचा मूळ अर्थ विसरले आहेत. पण तरीही स्‍माईली पाहिल्‍यानंतर काही क्षणासाठी का असेना पण चेहर्‍यावर हास्‍य फुलते हेही तितकेच खरे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -