घरCORONA UPDATEकेंद्र सरकारकडून मदत मिळाली नाही असे कधीही म्हटले नाही - संजय राऊत

केंद्र सरकारकडून मदत मिळाली नाही असे कधीही म्हटले नाही – संजय राऊत

Subscribe

श्रमिक मजुरांना रेल्वेने त्यांच्या मूळ गावी पाठवण्यावरून काही वाद होते. त्याव्यतिरिक्त अन्य काही वाद नाहीत असेही संजय राऊत यावेळी म्हणालेत.

राज्याला केंद्र सरकारकडून सहकार्य मिळालं नाही असे आम्ही कधीही म्हटले नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. श्रमिक मजुरांना रेल्वेने त्यांच्या मूळ गावी पाठवण्यावरून काही वाद होते. त्याव्यतिरिक्त अन्य काही वाद नाहीत असेही संजय राऊत यावेळी म्हणालेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी चर्चा सुरू असते. मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शनही मिळत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. राज्य सरकारला केंद्र सरकारकडून मदत केली जात नाही असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत असताना आता संजय राऊत यांचे हे वक्तव्य आश्चर्य व्यक्त करणारे आहे. दरम्यान मुंबईची स्थिती आता नियंत्रणात आली आहे. शुक्रवारी एका दिवसात ८ हजार ५०० रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले त्यामुळे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सोबत राहायला हवे. कोणीही राजकारण करू नये. पुढील सहा महिने आपल्याला राजकारण करायचे नाही असे संजय राऊत यावेळी म्हणालेत. तसेच हे सरकार पूर्ण पाच वर्ष चालणार आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे असे सांगत “विरोधीपक्षाचे नेते शॅडो कॅबिनेट चालवतात. ते सरकारवर अंकुश ठेवतात. आमचे काही चुकले तर फडणवीसांनी तसे करायला हवे. आम्हाला सरकार चालवण्यात कोणतीही अडचण नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

निर्णय प्रक्रियेवरून विसंवाद नाही

दरम्यान निर्णय प्रकियेमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यामध्ये विसंवाद पहायला मिळत असताना निर्णय प्रक्रियेवरून महाराष्ट्रात कोणताही विसंवाद नाही. निर्णय घेण्याचे अधिकार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच असल्याचे राऊत यांनी सांगितले. दरम्यान यावेळी भाजपासोबत दुरावा निर्माण होण्याचे कारण आम्ही नाही. आम्ही गेल्या ३० वर्षांपासून एकत्र होतो. राजकारणात टाळी एका हाताने वाजत नाही, असे सांगत सध्या सरकार उत्तम आणि शांतीपूर्ण मार्गानं चालल्याचे राऊत यावेळी म्हणालेत.

- Advertisement -

मोदी सरकारच्या कामगिरीवर टीका करणे योग्य नाही

मोदी २ सरकारला एक वर्षे पूर्ण झाले असून,  त्यांच्या एका वर्षांच्या कामावर टीका करणे योग्य नसल्याचे राऊत यावेळी म्हणालेत. गेल्या वर्षभरात काही चांगली कामेही झाली. गेले काही महिने करोनाचं संकट देशावर आले आहे. परंतु सरकारच्या मागील कार्याकाळापासून सुरू असलेले अर्थव्यवस्थेवरील संकट आताही कायम आहे. या सराकरने अनेक चांगली कामे देखील केली आहेत. तिहेरी तलाक, कलम ३७० हटवणं, राममंदिराची उभारणी अशी अनेक कामे सरकारने केल्याचे राऊत यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -