घरदेश-विदेशनिर्भयाच्या बलात्कार्‍यांना फाशीची नवी तारीख

निर्भयाच्या बलात्कार्‍यांना फाशीची नवी तारीख

Subscribe

१ फेब्रुवारी; सकाळी ६ वाजता

देशाला हादरवून सोडणार्‍या दिल्लीतील निर्भया बलात्कारातील नराधमांविरोधात नवं डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. येत्या 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता चारही दोषींना फासावर लटकवण्यात येणार आहे. दिल्ली कोर्टाने याबाबतचा निर्णय दिला आहे. निर्भयावर पाशवी बलात्कार करून तिची हत्या करणार्‍या चौघा दोषींपैकी एक दोषी मुकेश सिंह याने दयेचा अर्ज केल्याने आधी ठरलेली २२ जानेवारी ही फाशीची तारीख पुढे गेली होती. शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्याचा दयेजा अर्ज फेटाळल्याने चौघांना फाशीवर चढवण्याचा मार्ग मोकळा झाला.

मुकेश सिंह याने राष्ट्रपतींकडे मंगळवारी दयेचा अर्ज केला होता. तत्पूर्वी त्याने आपल्याला ठोठावण्यात आलेली शिक्षा कमी करावी अशी विनंती सुप्रीम कोर्टाकडे केली होती. त्याची ही विनंतीही सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली होती. मुकेश सिंह याच्या या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी पतियाळा हाऊस कोर्टाने म्हटले होते की या प्रकरणातील दोषींना २२ जानेवारीला फाशी देता येणार नाही.

- Advertisement -

दोषी मुकेश सिंह याचा दयेचा अर्ज प्रलंबित असल्याने फाशी देता येणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले होते.
हायकोर्टाने शुक्रवारी अक्षय ठाकूर (31), पवन गुप्ता (25), मुकेश सिंह (32) आणि विनय शर्मा (26) नवे डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यानुसार तिहार तुरुंगात चारही दोषींना 1 फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता एकाच वेळी फाशी दिली जाईल. जेल नंबर तीनमध्ये चौघाही दोषींना फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. उत्तर प्रदेशातील जल्लाद चौघांना एकामागून एक फासावर लटकवेल. या कुटुंबात पिढ्यान् पिढ्या हेच काम केले जाते. मात्र निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवणारी व्यक्ती पहिल्यांदाच जल्लाद म्हणून काम करणार आहे.

16 डिसेंबर 2012 रोजी 6 नराधमांनी निर्भयावर गँगरेप केला होता. या प्रकाराने संपूर्ण देश हादरला होता. या पाशवी बलात्कारानंतर निर्भयाची प्रकृती बिघडली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. नऊ महिन्यांनंतर सप्टेंबर 2013 मध्ये कनिष्ठ कोर्टाने दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. मार्च 2014 मध्ये उच्च न्यायालयाने आणि मे 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.

- Advertisement -

तिहार प्रशासन सज्ज
तिहार तुरुंगात चौघांच्या फाशीची तयारी पूर्ण झाली आहे. दोषींच्या डमींना रविवारी फाशी देऊन रंगीत तालीम करण्यात आली होती. प्रत्येक दोषीच्या वजनाइतकी दगड-मातीने भरलेली पोती फासावर लटकवून तयारी करण्यात आली. पोत्याला गळफास लावून दोरीची क्षमता तपासण्यात आली. जल्लादाला न बोलावता तुरुंगातील अधिकार्‍यांनीच फाशीची प्रक्रिया पूर्ण केली होती.

तिहार प्रशासन सज्ज
तिहार तुरुंगात चौघांच्या फाशीची तयारी पूर्ण झाली आहे. दोषींच्या डमींना रविवारी फाशी देऊन रंगीत तालीम करण्यात आली होती. प्रत्येक दोषीच्या वजनाइतकी दगड-मातीने भरलेली पोती फासावर लटकवून तयारी करण्यात आली. पोत्याला गळफास लावून दोरीची क्षमता तपासण्यात आली. जल्लादाला न बोलावता तुरुंगातील अधिकार्‍यांनीच फाशीची प्रक्रिया पूर्ण केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -