घरदेश-विदेशपाकचं नवं सरकारही कुलभूषण जाधव यांच्या विरोधातच

पाकचं नवं सरकारही कुलभूषण जाधव यांच्या विरोधातच

Subscribe

इमरान खानचं आलेलं नव पाकिस्तानी सरकारही कुलभूषण जाधवच्या विरोधात असल्याचं समोर आलं आहे. जाधव यांच्या विरोधात योग्य पुरावे असल्याचं सांगून आंतरराष्ट्रीय न्यायलयात पाकिस्तानचा विजय होणार असा दावा

पाकिस्तानमध्ये हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली कुलभूषण जाधवला पाकिस्तानमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र आता इमरान खानचं आलेलं नव पाकिस्तानी सरकारही कुलभूषण जाधवच्या विरोधात असल्याचं समोर आलं आहे. जाधव यांच्या विरोधात पाकिस्तानकडे पक्का पुरावा असल्याचं नवे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सांगितलं आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये फाशीच्या शिक्षेविरोधात सुरु असणारा खटला पाकिस्तानच जिंकेल असंही त्यांनी म्हटलं आहे.

कुलभूषणचा खटला अजूनही चालू

कुलभूषण जाधव यांना एप्रिल, २०१७ मध्ये पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. या खटल्याचा निकाल पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये लागण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांनी युक्तीवाद केला आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी जाधव यांना मार्च २०१६ मध्ये बलुचिस्तानमधून ताब्यात घेतलं. दरम्यान, जाधव यांनी इराणमधून पाकिस्तानात घुसखोरी केली असाही दावा करण्यात आला आहे. त्यामुळं या सगळ्याच्या बाबतीत कुरेशी यांनी मुल्तानच्या प्रसिद्धी माध्यमांसमोर जाधव यांच्या विरोधात योग्य पुरावे असल्याचं सांगून आंतरराष्ट्रीय न्यायलयात पाकिस्तानचा विजय होणार असा दावा केला आहे. पहिल्या सुनावणीमध्ये भारताच्या बाजूनं निकाल लागल्यानंतर आता असा दावा पाकिस्तान करत आहे.

- Advertisement -

पाककडून युक्तीवाद

कुलभूषण जाधव हे काही साधारण व्यक्ती नसून ते भारताचे हेर आहेत असा युक्तीवाद आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये पाककडून करण्यात आला आहे. पाकमध्ये काहीतरी घातपात करण्याच्या उद्देशाने कुलभूषण पाकिस्तानामध्ये येत होते, या पाकच्या आरोपांना भारताने फेटाळले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -