घरदेश-विदेशएक किलो प्लास्टिक द्या; मोफत जेवून जा!

एक किलो प्लास्टिक द्या; मोफत जेवून जा!

Subscribe

एक किलो प्लास्टिक कचऱ्याच्या बदल्यात मोफत जेवण देण्याता स्तुत्य उपक्रम ओडिशा सरकारने हाती घेतला आहे.

प्लास्टिक वापरण्याबाबत सध्या गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. याचपार्श्वभूमीवर प्लास्टिकच्या धोक्यांबाबत जनजागृती करण्याकरिता ओडिशा सरकारने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामध्ये एक किलो प्लास्टिक कचऱ्याच्या बदल्यात गरिब व्यक्तींना मोफत जेवण देण्याचे ठरवले आहे. कोरापुट जिल्ह्यात कोटापड अधिसूचित मंडळाच्या अखत्यारित ही योजना राबवण्यात आली आहे.

भात आणि डाळमाची मेजवानी

राज्य सरकारच्या आधार योजनेत हा उपक्रम समाविष्ट केला असून या उपक्रमामध्ये जी व्यक्ती प्लास्टिक बाटल्या, पिशव्या, कप यांचा एक किलो कचरा आणून देईल त्यांना मोफत जेवण देण्यात येत आहे. दरम्यान, ओडिशा सरकारच्या आहार योजनेत शहरी भागातील गरिबांना भात आणि डाळमा (भाजी – वरण) असा आहार अवघ्या ५ रुपयात दिला जातो. मात्र, आता ज्या व्यक्ती १ किलो प्लास्टिक आणून देतील त्या व्यक्तींना मोफत जेवण दिले जाणार आहे.

- Advertisement -

प्लास्टिक कचऱ्याच्या बदल्यात मोफत जेवण देण्याच्या योजनेचे फलक लावण्यात आले असून आधार केंद्रावर त्यासाठी खास काउंटर सुरु करण्यात आले आहेत. तसेच सोमवारी या योजनेत दहा किलो प्लास्टिक कचरा गोळा झाला आहे. त्यामुळे आधार योजनेत दहा जणांना मोफत जेवण देण्यात आले आहे.

प्लास्टिक कचऱ्याने गटारी तुंबतात आणि त्यामुळे पक्षी, प्राणी मरतात. माणसाला अनेक आजार होतात. त्यामुळे पर्यावरण रक्षणासाठी आमची ही योजना आहे. तसेच या योजनेमुळे पुढील काळात या योजनेमुळे शहर पॉलिथिन कचरा मुक्त होईल.  – आलोक सामंतराय; कोटापडचे मुख्य कार्यकारी अधिकारी

- Advertisement -

हेही वाचा – ISISचा म्होरक्या अबु बक्र अल-बगदादी कसा मेला ते कळणार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -