घरदेश-विदेशUS मध्ये नव्या रोगाचा फैलाव! ३४ राज्यात ४०० पेक्षा जास्त लोकं आजारी

US मध्ये नव्या रोगाचा फैलाव! ३४ राज्यात ४०० पेक्षा जास्त लोकं आजारी

Subscribe

या आजाराची लक्षणे ६ तास ते ६ दिवसांपर्यंत कधीही दिसू शकतात.

कोरोनानंतर अमेरिकेच्या बर्‍याच राज्यात नवीन आजार फैलावत आहे. लाल आणि पिवळ्या कांद्यामुळे हा रोग पसरत असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत अमेरिकेच्या ३४ राज्यांतील ४०० हून अधिक लोक या आजारामुळे गंभीर आजारी पडले आहेत. अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन (सीडीसी) ने लोकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले असून कांदे खाण्याविषयी सावधगिरीचा इशारा दिला आहे.

लाल आणि पिवळ्या कांद्यापासून साल्मोनेला बॅक्टेरियाचा संसर्ग अमेरिकेच्या बर्‍याच राज्यांत पसरत आहे, ३४ राज्यात ४०० हून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. अमेरिकेच्या सर्वात मोठ्या आरोग्य एजन्सी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन (सीडीसी) ने याबाबत सतर्कता जारी करून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

थॉमसन इंटरनॅशनल नावाच्या कंपनीने पुरवठा केलेला कांदा खाऊ नये म्हणून सीडीसीने लोकांना सांगितले आहे. जर त्या कांद्यांचा वापर अन्न शिजवण्यास केला किंवा हा कांदा या कंपनीने पुरविला असेल तर तो ताबडतोब योग्य ठिकाणी फेकून द्या, असे देखील सांगितले आहे. कॅनडामध्ये साल्मोनेला बॅक्टेरियाच्या संसर्गाची घटना घडली समोर आली आहेत. या बॅक्टेरियामुळे आतापर्यंत ६० लोक कॅनडामधील रुग्णालयात दाखल आहेत.

- Advertisement -

अमेरिकेच्या फूड अ‍ॅण्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने सांगितले की, अमेरिकेच्या ३४ राज्यात पसरलेल्या साल्मोनेलाचा थेट लाल कांद्याशी थेट संबंध आहे. तर सीडीसीने म्हटले आहे की, सुरूवातील रूग्ण हे १९ जून ते ११ जुलै दरम्यान नोंदविण्यात आली. थॉमसन इंटरनॅशनल लाल, पांढरा, पिवळा आणि गोड कांदे परत मागवण्यात आले आहेत. या कंपनीने पुरवठा केलेला कांदा खाण्याची आवश्यकता नाही.

जेव्हा या बॅक्टेरियामुळे माणसं आजारी असता तेव्हा अतिसार, ताप आणि ओटीपोटात वेदना अशी लक्षणे दिसून येतात. त्याची लक्षणे ६ तास ते ६ दिवसांपर्यंत कधीही दिसू शकतात.


Google ची कठोर कारवाई; २५०० हून अधिक चिनी यूट्यूब चॅनेल केले Delete!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -