न्यूझीलंडच्या समलैगिंक क्रिकेटपटूच्या घरी नवीन पाहुणा येणार!

न्यूझीलंडची महिला क्रिकेट संघाची कर्णधार अॅमी सॅटर्थवेटनं ती गर्भवती असल्याची बातमी सोशल मीडियावरुन शेअर केली.

Mumbai
New Zealand captain Amy Satterthwaite announces pregnancy on social media
न्यूझीलंडची महिला क्रिकेट संघाची कर्णधार अॅमी सॅटर्थवेट आणि क्रिकेटर ली ताहूहूशी

न्यूझीलंडची महिला क्रिकेट संघाची कर्णधार अॅमी सॅटर्थवेटनं ली ताहूहूशी २०१४ मध्ये साखरपुडा केला होता. त्यानंतर २०१७ मध्ये या दोघांचा विवाह झाला. मंगळवारी अॅमी सॅटर्थवेटनं ती गर्भवती असल्याची घोषणा केली. जानेवारी २०२० मध्ये आपल्या घरी चिमुकला पाहुणा येणार असल्याचे तिनं सोशल मीडियावरुन जाहीर केलं. त्यानंतर चाहत्यांचा अभिनंदनाचा वर्षाव पडला. अॅमी गर्भवती असल्यामुळे आता ती क्रिकेट खेळू शकणार नाही आहे. २०२०मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप तिला सहभाग घेता येणार नाही आहे. तसेच ती २०२१ मध्ये होणाऱ्या महिलांच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतून क्रिकेटच्या मैदानावर परत येणार आहे.


हेही वाचा – ‘या’ साठी बायको लाडूशिवाय दुसरे काही खाऊच देत नाही


सेंट्रल करारात न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने नुकतीच वाढ केली आहे. या मंडळाने गर्भवती खेळाडूंसाठी प्रसुतीजानी मान्य केली होती. याचा लाभ घेणारी अॅमी ही पहिली खेळाडू आहे. अॅमीने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. हे पोस्ट शेअर करताना तिने लाहूहूचेही अभिनंदन मानले आहे. ती शेअर करताना अशी म्हणाली आहे की, ‘ली आणि मला तुम्हाला ही बातमी सांगताना खूप खूप आनंद होत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला आमच्या घरी नवीन पाहुणा येईल’, अशी मला अपेक्षा आहे. आम्ही आतुरतेनं या नव्या जबाबदारी वाट पाहत आहे.

पहिले महिला क्रिकेटमधील हे न्यूझीलंडचे जोडपे आहे. अॅमीसमोर चार वर्षांनी लहान असलेल्या ली हिने विवाहाचा प्रस्ताव ठेवला होता. ते दोघे २०१७मध्ये विवाहबंधनात अडकले. महिला क्रिकेटमधील ली ताहूहू ही सर्वात वेगवान गोलंदाजांमध्ये गणली जाते.


हेही वाचा – अनुष्काच्या ‘या’ हॉट फोटोवर नेटकऱ्यांचे मीम्स व्हायरल