भारत आक्रमक; न्यूझीलंडच्या दहशतवाद्याचा जाहीरनामा समोर

न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च शहरातील दोन मशिदींमध्ये गोळीबार करणारा दहशतवादी ब्रेनटॉन टॅरॅन्टचा जाहीरनामा समोर आला असून या जाहीरनाम्यात भारत आक्रमक असल्याचे त्यांनी त्या म्हटले आहे.

New-zealand
new zealand gunmans manifesto invaders from india and enemies-in the east
न्यूझीलंडच्या दहशतवाद्याचा जाहीरनामा समोर

न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च शहरातील दोन मशिदींमध्ये गोळीबार करणारा दहशतवादी ब्रेनटॉन टॅरॅन्टचा जाहीरनामा समोर आला आहे. हा जाहीरनामा ७४ पानांचा असून प्रश्न उत्तराच्या स्वरुपात आहे. या जाहीरनाम्यात भारत, चीन आणि टर्की हे आक्रमणकारी देश असून पूर्वेकडचे हे देश शत्रू असल्याचा देखील त्यांनी त्यामध्ये उल्लेख केला आहे. तसेच त्यांनी भारतीय देखील आक्रमणकारी असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे.

अजून काय आहे या जाहीरनाम्यात

‘द ग्रेट रिप्लेसमेन्ट’, असे या जाहीरनाम्याचे शीर्षक असून हे आक्रमणकारी कुठून आले किंवा कधीही आले असतील तरी त्यांना युरोपच्या भूमीवरुन हद्दपार केले पाहिजे. ते आपले लोक नसून ते आपल्या भूमीवर राहत आहेत. त्यांना इकडून बाहेर काढलेच पाहिजे, असे टॅरॅन्टने त्याच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. प्रश्न, उत्तराच्या स्वरुपात हा जाहीरनामा आहे. दोन वर्ष आधी आपण या हल्ल्याचा कट आखला होता. ख्राईस्टचर्चची निवड तीन महिन्यांपूर्वी केली, असे या दहशतवाद्याने म्हटले आहे.

हा काळा दिवस असून अशा हिंसाचाराला न्यूझीलंडमध्ये अजिबात स्थान नाही. – जेसिंडा आर्डर्न, न्यूझीलंडच्या पंतप्रधान

नेमके काय घडले?

न्यूझीलंडच्या दक्षिण आयलंड शहरातील एका अल नूर मस्जिदमध्ये अज्ञाताने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या गोळीबाराची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल होऊन त्यांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली. अज्ञातानं केलेल्या या गोळीबारात ४९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, क्रिकेट सामन्यांसाठी बांगलादेशातील खेळाडू न्यूझीलंडमध्ये असताना, शुक्रवारी सकाळी मशिदीत ते नमाजासाठी गेले होते. मात्र सुदैवाने ते या गोळीबारातून थोडक्यात बचावले आहेत. जखमींना ख्रिस्टचर्च हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यातील ३० रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून यामध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.


वाचा – न्यूझीलंडमधील मशिदीत गोळीबार; ४९ जणांचा मृत्यू


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here