Tuesday, January 19, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग Video: माणुसकीला कलंक! पोत्यामध्ये भरून ठेवलं जिवंत नवजात अर्भक!

Video: माणुसकीला कलंक! पोत्यामध्ये भरून ठेवलं जिवंत नवजात अर्भक!

Related Story

- Advertisement -

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये एक भीषण प्रकार दिसत आहे. काही गावकऱ्यांना पोत्यांमध्ये एक नवजात अर्भक सापडल्याचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या मीरतमधला असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये दिसत असलेला प्रकार अत्यंत भयानक असून त्यावरून या अर्भकाच्या आई-वडिलांना नेटिझन्सनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. ट्वीटरवर मावेद बावा नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्वीट झालेला आहे. मात्र, हा व्हिडिओ पाहणाऱ्याच्या अंगावर काटा उभा करणारा ठरतोय.

काय आहे व्हिडिओमध्ये?

उत्तर प्रदेशच्या मीरतमधला हा व्हिडिओ असून यात काही गावकरी गोणपाटातून दोन पिशव्या काढताना दिसत आहेत. यातून शेवटच्या पिशवीतून एक नवजात अर्भक बाहेर पडताना दिसत आहे. बाजूने जाणाऱ्या गावकऱ्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर त्यांनी पोते उघडून पाहिले आणि त्यात त्यांना जिवंत अर्भक आढळलं. हा प्रकार पाहून उपस्थित गावकऱ्यांना काही काळ धक्का बसला. त्यानंतर काही गावकऱ्यांनी लागलीच पोलिसांना पाचारण केलं.

- Advertisement -

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बाळाला ताब्यात घेतलं. या बाळाला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या बाळाची प्रकृती आता चांगली असून त्याच्या आई-वडिलांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -