घरदेश-विदेशएनआयएची काश्मिरमधीर फुटीरतावाद्यांच्या घरात छापेमारी

एनआयएची काश्मिरमधीर फुटीरतावाद्यांच्या घरात छापेमारी

Subscribe

एनआयएने आज जम्मू काश्मिरमधील फुटीरतवादी नेत्यांच्या परिसरात छापेमारी केली असून या कारवाईत मीरवाईज फारूकसह इतरही नेत्यांच्या घरांचा समावेश होता. ही कारवाई दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना अर्थसहाय्य करण्याच्या कारणावरून करण्यात आली आहे. यासंबंधीत अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफ जवानांच्या मदतीने छापेमारीची कारवाई केली. यामध्ये मीरवाईज, पाकिस्तान समर्थक फुटीरतावादी सैय्यद अली शाह गिलानी यांचा मुलगा नसीम गिलानी आणि तहरीक ए हुर्रियतचे प्रमुख अशरफ सेहराईसह इतरही फुटीरतवाद्यांच्या घराची झडती घेण्यात आली.


यांच्याही घरावर छापेमारीची कारवाई

जेकेएलएफ नेता यासिन मलिक, शब्बीर शाह, जफर भट आणि मसर्रत आलम यांच्याही घरावर छापेमारी करण्यात आली. एनआयए यांनी गेल्या वर्षी मीरवाईजचे दोन मामा मौलवी मंजूर आणि मौलवी शाफत तसेच त्यांचे दोन निकटवर्तीय यांचीही चौकशी केली होती.

- Advertisement -

फुटीरतावाद्यांविरोधात चार्जशीट दाखल 

लष्कर ए तोयबासारख्या दहशतवादी संघटेना पैसा पुरवणाऱ्या ६ फुटीरतावाद्यांवर छापेमारीची कारवाई केल्यानंतर त्यांच्याविरोधात एनआयएने चार्जशीटदेखील दाखल केली आहे. ही चार्जशीट चैन्नईमधील आशिक ए या खास एनआयएच्या कोर्टात दाखल करण्यात आली आहे.

यांच्याविरोधात चार्जशीट दाखल

  • इस्माईल एस. (वय २५)
  • समसुद्दीन (वय २२)
  • मोहम्मद सलाउद्दीन एस. (वय २५)
  • जाफर सादीक अली (वय ३१)
  • शाहुल हमीद (वय २३)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -