घरदेश-विदेशतामिळनाडू: कोईंबतूरमध्ये एनआयएचे पाच ठिकाणी छापे

तामिळनाडू: कोईंबतूरमध्ये एनआयएचे पाच ठिकाणी छापे

Subscribe

छाप्यांमध्ये आतापर्यंत लॅपटॉप, मोबाइल फोन, सिम कार्ड आणि पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आले

तामिळनाडूतील कोईंबतूर शहरात राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएने पाच ठिकाणी छापे टाकले आहे. या पाच ठिकाणांमध्ये कोईंबतूर शहरातील उक्कदम, बिलाल नगर आणि करूम्बुकदाई येथे ही छापे टाकले आहे. ही छापेमारी सुरू असताना संशयित सामग्री जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, कोणत्या कारणांसाठी एनआयएने छापे टाकले हे अद्याप अस्पष्ट आहे.

- Advertisement -

एनआयएने टाकलेल्या छाप्यात ९ मोबाइल, १५ सिमकार्ड, ७ मेमरी कार्ड, ३ लॅपटॉप, ५ हार्डडिस्क, ६ पेन ड्राइव्ह, दोन टॅब, तीन सीडी आणि डिव्हीडी जप्त केल्या होत्या. याव्यतिरिक्त काही मासिके, बॅनर्स, पोस्टर्स आणि पुस्तकेही जप्त करण्यात आली होती.

देशभरात हाय अलर्ट जारी; एनआयएकडून छापेमारी सुरू 

गेल्या काही दिवसांपुर्वी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे सहा दहशतवादी श्रीलंकेतून भारतात घुसले असून तामिळनाडूतील कोईंबतूरमध्ये ते पोहोचल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. सहा दहशतवाद्यांपैकी एक पाकिस्तानी, एक श्रीलंकन, तर एक भारतीय नागरिक असल्याची गुप्तचर यंत्रणांची माहिती आहे. त्यामुळे संपुर्ण देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर एनआयएकडून छापेमारी सुरू आहे. या प्रकरणी काही लोकांची चौकशी देखील केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -