घरदेश-विदेशतामिळनाडूत एनआयएच्या पथकाचे १६ ठिकाणी छापे

तामिळनाडूत एनआयएच्या पथकाचे १६ ठिकाणी छापे

Subscribe

या दहशतवाद्यांनी अंसारुल्ला नावाची संघटना स्थापन केली होती.

गेल्या काही दिवसांपूर्वीच छापेमारी करत तामिळनाडूमध्ये एका अशा संघटनेचा एनआयए पर्दाफाश केला होता. देशभरात मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणण्याच्या तयारीत असलेल्या तमिळनाडूमधील दहशतवादी संघटनेचा शोध घेण्यास राष्ट्रीय तपास संस्था एनआयए यशस्वी झाले आहे.

- Advertisement -

या दहशतवाद्यांनी अंसारूल्ला नावाने संघटना तयार केली होती. या प्रकरणी आज शनिवारी एनआयएच्या पथकाने मोठी कारवाई करून तामिळनाडूच्या १६ ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईमध्ये मोहम्मद शेख यांच्या घरावरही एनआयएच्या पथकाने छापा टाकला.

९ जुलै रोजी एनआयएकडून गुन्ह्याची नोंद केली होती. यामध्ये संशयित दहशतवादी चेन्नई आणि नागपट्टीनम जिल्हयातील राहणारे असून देशात हल्ले करण्याच्या तयारीत काही दहशतवादी होते. यामध्ये देशाबाहेरील देखील काही माणसांचा समावेश होता.

- Advertisement -

भारतात इस्लामिक राज्य स्थापन करण्याचा हेतू

आरोपी सय्यद मोहम्मद बुखारी, हसन अली आणि मोहम्मद युसुफुद्दिन यांच्या साथीदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले आहे. ते भारतात दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होते. भारतात इस्लामिक राज्य स्थापन करण्याचा या दहशतवाद्याचा हेतू आहे. बेकायदेशीर कृत्य रोखण्याच्या अधिनियम कायद्याअंतर्गत या दहशतवाद्यांविरोधात केस दाखल करण्यात आली. एनआयएने चेन्नई येथे वास्तवात असणाऱ्या सय्यद बुखारी याच्या घरावर छापेमारी केली होती. तर नागपट्टीनम जिल्ह्यात हसन अली आणि मोहम्मद युसुफुद्दिन याच्या घरावर देखील छापेमारी केली. छापेमारी नंतर एनआयए आरोपींची कसून चौकशी करत असल्याचे एनआयएने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -