घरदेश-विदेशसावधान ! 'निपाह' व्हायरस पसरतोय

सावधान ! ‘निपाह’ व्हायरस पसरतोय

Subscribe
‘निपाह व्हायरस’ दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकतोय..

सध्या देशभरात सर्वत्र निपाह व्हायरसची दहशत पसरली आहे. विशेषत: दक्षिणेकडील राज्यांवर निपाहचे सावट आहे. केरळमध्ये निपाह व्हायरसने जवळपास १० जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे केरळात भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र, मृत्यूतांडव माजवणारा हा भयानक व्हायरस आता हळूहळू कर्नाटकातही पसरतो आहे.

कर्नाटक व्हायरसच्या टार्गेटवर?

आरोग्य अधिकारी आणि तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कर्नाटकामधील २ लोकांना निपाह व्हायरसची लागण झाल्याची लक्षणे समोर आली आहेत. एका २० वर्षीय महिलेला आणि ७५ वर्षांच्या वृद्ध माणसाला या व्हायरसची बाधा झाल्याची लक्षणे दिसून आली आहेत. ही माहिती जाहीर झाल्यामुळे आता कर्नाटकमधील लोकांमध्ये चांगलीच भीती पसरली आहे.

- Advertisement -
केरळात जाऊन आल्याने लागण

कर्नाटकातील आरोग्य अधिकारी राजेश बीव्ही यांनी दिलेल्या माहितीनुसार, निपाह व्हायरसची लक्षणे आढळलेले दोन्ही रूग्ण नुकतेच केरळमध्ये जाऊन आले आहेत. यावेळी निपाह व्हायरसची लागण झालेल्या लोकांच्या संपर्कात हो दोघे आले असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच या दोघांना ‘निपाह’ची लागण झालेली असण्याची शक्यता असून, तशा प्रकरची लक्षणे त्यांच्यात दिसत आहेत. अद्याप त्यांना व्हायरसची लागण झाली असल्याबाबत काहीच ठोस सांगण्यात आलेले नाही.

सावधान! निपाह येतोय…

दरम्यान निपाह व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लोकांना वारंवार सतर्कतेचा इशारा दिला जात आहे. लोकांनी कुठल्याही प्रकारचे अन्नपदार्थ आणि विशेषत: फळे खाण्यापूर्वी सावध राहावे, असे आरोग्य अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. तसंच या व्हायरसची कुठलीही लक्षणे स्वत:मध्ये वा इतरांमध्ये आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन कर्नाटकातील लोकांना करण्यात आले आहे.

- Advertisement -
काय आहे ‘निपाह व्हायरस’?

निपाह’ व्हायरस हा संसर्गजन्य आजार असून वटवाघुळांपासून हा आजार पसरत असल्याचे समोर आले आहे. १९९८ साली हा आजार पहिल्यांदा मलेशियामध्ये आढळला होता. त्यावेळी हा आजार डुकरांना होत होता. त्यानंतर खजुराची शेती करणाऱ्या लोकांना या फ्रूट वटवाघूळापासून हा आजार होत असल्याचे निदर्शनास आले आणि त्यानंतर हा आजार माणसांना होऊ लागला. हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे संपर्कात येऊन हा तो अधिक पसरू शकतो.

 

‘निपाह’ ची लक्षणे
निपाहची लागण झाल्यास मेंदूला सूज येते. ताप, डोकेदुखी, चक्कर येणे, उलट्या होणे ही या आजाराची काही लक्षणे आहेत. हा संसर्ग शरीरात भिनल्यास माणूस कोमात देखील जाऊ शकतो आणि त्याचा मृत्यूदेखील होऊ शकतो.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -