घरदेश-विदेशकर्जबुडव्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक

कर्जबुडव्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक

Subscribe

पीनबी घोटळ्याप्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदी यांना मंगळवारी रात्री लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. वेस्टमिंस्टर पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

पीनबी घोटळ्याप्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदी यांना काल, मंगळवारी रात्री लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. वेस्टमिंस्टर पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. आज, बुधवारी नीरव मोदी यांना कोर्टात हजर करण्यात आलं आहे. पीनबी गैरव्यवहार प्रकरणी नीरव मोदीला अटक करण्यात आली असून त्यांनी तब्बल १४ हजार कोटींचा गैरव्यवहार करून भारतातून पलायन केले होते. अखेर नीरव मोदीच्या अटक कारवाईमुळे भारताच्या पाठपुराव्याला यश आल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

नीरवच्या प्रत्यार्पणावर कोर्टात सुनावणी 

भारतीय बँकांची हजारो कोटी रुपयांची फसवणूक करून लंडन येथे फरारी झालेल्या नीरवचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. लंडनमधील रस्त्यांवर उजळ माथ्याने फिरणाऱ्या मोदीला पाहून अनेकांनी टीका केली होती. नीरवविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली होती. ब्रिटनमधील वेस्टमिन्स्टर कोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत अटक वॉरंट जारी केले होते. त्यानंतर त्याला लंडनमध्ये अटक करण्यात आल्याचं वृत्त टाइम्स नाऊनं दिलं आहे. आजच त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. नीरवच्या प्रत्यार्पणावर कोर्टात सुनावणी सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -