घरताज्या घडामोडीनिर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा थांबली; दया अर्ज ठरला अडसर!

निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा थांबली; दया अर्ज ठरला अडसर!

Subscribe

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना २२ जानेवारीला फाशी देणं अशक्य झाल्यामुळे ही फाशी पुढे ढकलण्यात आली आहे.

दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये दोषी ठरलेल्या चौघा गुन्हेगारांना येत्या २२ जानेवारी रोजी फाशी दिले जाणार नाही यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. यातल्या मुकेश सिंह या दोषीने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला आहे. या अर्जावरचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर २२ तारखेला या चौघांना फाशी देता येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता या दया अर्जावर निर्णय कधी येणार? आणि या दोषींना फाशी देण्यासाठी अजून किती काळ वाट पाहावी लागणार? असे प्रश्न सामान्यांना पडले आहेत. दरम्यान, फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीसंदर्भात तुरुंग प्रशासनाला न्यायालयात अहवाल सादर करावा लागणार आहे. शुक्रवारी हा अहवाल सादर झाल्यानंतर याविषयी अधिक तपशील जाहीर होऊ शकेल.

काय घडलं नक्की?

दिल्ली उच्च न्यायालयाने ७ जानेवारी रोजी निर्भयाच्या चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम केली आणि २२ जानेवारी ही तारीख देखील फाशीसाठी निश्चित केली. मात्र, त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे ९ जानेवारी रोजी या चौघा दोषींपैकी एक असलेल्या विनय शर्माने दयेचा अर्ज केला. हा अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर पुन्हा मुकेश सिंह या दोषीने दयेचा अर्ज केला. हाच दयेचा अर्ज अजूनही प्रलंबित आहे. त्यामुळे २२ जानेवारीला फाशी देणं अशक्य असल्याचं समोर आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -