Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी निर्भयाच्या आईला दोषींच्या वकिलांचं आव्हान

निर्भयाच्या आईला दोषींच्या वकिलांचं आव्हान

पतियाळा कोर्टाने दोषींची फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात आल्यानंतर निर्भयाच्या दोषींच्या वकिलांनी तिच्या आईलाच आव्हान दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Related Story

- Advertisement -

निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींची पतियाळा न्यायालयाने फाशी पुन्हा पुढे ढकलली आहे. याआधी २२ जानेवारी रोजी त्यांना फाशी दिलं जाणार होतं. मात्र, तेव्हाही त्यांची फाशी पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान, फाशीची शिक्षा पुढे ढकलल्यानंतर ‘दोषींचे वकील ए. पी. सिंह यांनी आपल्याला इशारा दिला आहे’, असा खळबळजनक खुलासा निर्भयाच्या आईने केला आहे. ‘ए. पी. सिंह यांनी मला आव्हान दिलं आहे की निर्भयाच्या गुन्हेगारांना कधीही शिक्षा होऊ शकणार नाही’, असं निर्भयाच्या आईने पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. निर्भयाच्या दोषींची फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, ‘फाशी पुढे ढकलली असली, तरी मी माझा लढा कायम ठेवणार आहे. सरकारला त्या दोषींना फाशी द्यावंच लागेल’, असा निर्धार देखील निर्भयाच्या आईने बोलून दाखवला.

- Advertisement -


वाचा सविस्तर – निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा पुढे ढकलली!
- Advertisement -