घरदेश-विदेशनिर्भया केस : आरोपी विनय शर्माने भिंतीवर डोकं आपटून केला आत्महत्येचा प्रयत्न!

निर्भया केस : आरोपी विनय शर्माने भिंतीवर डोकं आपटून केला आत्महत्येचा प्रयत्न!

Subscribe

निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातला आरोपींना ३ मार्चला फाशी दिली जाणार आहे. आपल्याला फाशी दिली जाणार हे कळल्यानंतर सर्व आरोपींची वागणूक बदलली आहे. या प्रकरणातील आरोपी विनय शर्माने भिंतीवर डोकं आपटून स्वत:ला जखमी केल्याची घटना घडली आहे. विनयसह सर्व चार आरोपी दिल्लीतील तिहार जेलमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत आहेत. अतिशय कडक सुरक्षा व्यवस्थेत असतानाही विनयने डोकं भिंतीवर आपटल्यामुळे खळबळ उडाली आहे. गेली 7 वर्ष या सर्व आरोपींवर खटला सुरू असून आता त्यांना फाशी होणार हे निश्चित झालंय. 3 मार्चला सकाळी त्यांना तिहारमध्ये फाशी दिली जाणार आहे.

आरोपींच्या वागणूकीत बदल

आपल्याला फाशी मिळणार हे कळल्यापासून आरोपींच्या वागणूकीत बदल झाला आहे. काहींनी जेवण कमी केलय तर काहींनी बोलणं सोडलय. चारही गुन्हेगारांनी फाशीच्या भीतीनं खाणं-पिणं सोडलं आहे. चौघापैंकी विनयने दोन दिवसांपासून जेवण सोडलं आहे. पवनचेही खाणं-पिणं कमी झाल्याचं तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यातुलनेत मुकेश व अक्षय या दोघांच्या वागणुकीत फारसा बदल झालेला दिसून येत नाही.

- Advertisement -

फाशी टाकण्यासाठी केलेला प्रयत्न

फाशीची शिक्षा झाल्यानंतर यातल्या सर्व आरोपींनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना मिळणाऱ्या सगळ्या कलमांचा वापर करत फाशी टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र आता त्यांचे सर्व पर्याय संपले असून सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपतींनी त्यांच्या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. मुकेशने फाशी टाळण्यासाठी सर्वच कायदेशीर प्रयत्न केले होते. याची दया याचिकाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद्र यांनी फेटाळून लावली आहे.

फाशीसाठी या चौघांच्या गळ्याचं माप घेण्यात आलं आहे. गळ्याचा माप घेताना चौघे आरोपी ढसाढसा रडले. फाशी देताना सर्व नियमांचं पालन केलं जाणार असल्याचं तुरुंगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -