घरदेश-विदेशनिर्भयाच्या बलात्काऱ्यांना 'फाशी'च

निर्भयाच्या बलात्काऱ्यांना ‘फाशी’च

Subscribe

निर्भया बलात्कार प्रकरणात एकूण ६ जणांना अटक करण्यात आली होती. यातील एका आरोपीला अल्पवयीन म्हणून सोडण्यात आले तर राम सिंह नावाच्या आरोपीने तिहार कारागृहात आत्महत्या केली. त्यानंतर उरलेल्या आरोपींना दिल्ली हायकोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

१६ डिसेंबर २०१२ च्या रात्री दिल्लीत चालत्या बसमध्ये सामुहिक बलात्कार झाला. यात बलात्कार पीडित निर्भयाचे उपचारादरम्यान निधन झाले. या घटनेतील दोषी आरोपींनाअटक करण्यात आली. आणि देशभरातून निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशीच व्हायला हवी, असा एकच सूर उमटला. आज ६ वर्षानंतरही ही घटना आठवली तरी अंगावर काटा येतो. यातील तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेवर पूर्नविचार करणारी याचिका दोषींकडून दाखल करण्यात आली या याचिकेवरील सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होती. सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळत दोषींवरील फाशी कायम ठेवली आहे.

बलात्कार रोखण्यास सरकार अपयशी

निर्भयाची आई आशा देवी यांनी सुप्रीम कोर्ट दोषींना फाशीच देईल असा विश्वास प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवला होता. पण ६ वर्षांपूर्वी ही घटना झाली आणि आजही बलात्कारांच्या घटना या होतच आहेत. त्यामुळे हे सगळे रोखण्यास सरकार अपयशी ठरत आहे. या घटनांना आवर घालणे गरजेचे आहे, असे देखील त्यांनी सांगितले.

- Advertisement -

 

- Advertisement -

फाशीच्या शिक्षेविरोधात दाखल पूनर्विचार याचिका

निर्भया बलात्कार प्रकरणात एकूण ६ जणांना अटक करण्यात आली होती. यातील एका आरोपीला अल्पवयीन म्हणून सोडण्यात आले तर राम सिंह नावाच्या आरोपीने तिहार कारागृहात आत्महत्या केली. त्यानंतर उरलेल्या आरोपींना दिल्ली हायकोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मुकेश (२९), पवन गुप्ता (२२) आणि विनय शर्मा आणि अक्षय कुमार सिंह(३१) यांचा यात समावेश होता. यातील अक्षय वगळता तिघांनी शिक्षेविरोधात पूनर्विचार याचिका दाखल केली होती. ही फेटाळून लावत सुप्रीम कोर्टाने ही शिक्षा कायम ठेवली आहे.

फाशीच्या शिक्षेचीच मागणी

साऱ्या देशाचे लक्ष आजच्या निर्णयाकडे लागून राहिले होते. अनेकांनी या ‘आरोपींना फाशीच द्या’, अशी मागणी केली आहे.

नेमकं कायं झालं?

१६ डिसेंबर २०१२ :दिल्लीमधल्या मुनीरका भागात एका खासगी बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका तरुणीवर सामुहिक बलात्कार झाला. तिच्यासोबत असलेल्या तिच्या मित्राला आणि तिला बसमधून बाहेर फेकण्यात आले

१८ डिसेंबर २०१२: बलात्कार करणाऱ्या सहा  नराधमांना अटक करण्यात आली. राम सिंह, मुकेश, विनय शर्मा, पवन गुप्ता,अक्षय ठाकूर आणि एका अल्पवयीन गुन्हेगाराला अटक करण्यात आली

२९ डिसेंबर २०१२: निर्भयावर बलात्कार केल्यानंतर तिच्या गुप्तांगाला इजा करण्यात आली. तिच्यावर उपचार सुरु होते. संपूर्ण देश तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होता. पण अखेर तिने उपचारादरम्यान श्वास सोडला

 
३ जानेवारी २०१३: पोलिसांनी दोषींविरोधात हत्या, सामुहिक बलात्कार आणि हत्येचा प्रयत्न, अपहरण, चोरी अंतर्गत आरोपत्र दाखल केले

१७ जानेवारी २०१३:जलदगती न्यायालयात ५ जणांवरील आरोप सिद्ध झाले

११ मार्च २०१३:आरोपी राम सिंहने तिहार कारागृहात आत्महत्या केली

३१ ऑक्टोबर २०१३:बलात्कारातील अल्पवयीन आरोपीला बालसुधार गृहात ३ वर्षांसाठी पाठवण्यात आले

१० सप्टेंबर २०१३:जलदगती न्यायालयात उरलेल्या ४ आरोपींना १३ गुन्ह्यांसाठी दोषी ठरविण्यात आले

 
१३ सप्टेंबर २०१३- आरोपी मुकेश, विनय, पवन आणि अक्षयला फाशीची शिक्षा सुनावली

१३ मार्च २०१४- दिल्ली कोर्टाने चार आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवली

२०१४ ते २०१६ – फाशीच्या शिक्षेवर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली. आरोपी अक्षयने फाशीच्या शिक्षेविरोधात याचिका

दाखल केली नाही.

९ जुलै २०१८- सुप्रीम कोर्टाने तिघांवरील फाशीची शिक्षा कायम ठेवली.

बीबीसीची ‘ही’ डॉक्युमेंटरी ठरली वादग्रस्त

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया बलात्कार प्रकरणानंतर आरोपी मुकेशसोबत बीबीसीने एक डॉक्युमेंटरी केली. ज्यात मुकेशचे त्या घटनेतील बोलणे ऐकून तळपायातील आग मस्तकात जाते. ही डॉक्युमेंटरी अवघ्या काहीच दिवसात काढून टाकण्यात आली. या डॉक्युमेंटरीचा हा ट्रेलर आजही पाहिला तर आरोपींना फाशीच व्हावी हीच प्रतिक्रिया उमटते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -