निर्भयाच्या दोषींच्या फाशीवर शिक्कामोर्तब; २२ जानेवारी तारीख निश्चित

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे चारही दोषींना फासावर लटकवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चारही आरोपींना २२ जानेवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे.

New Delhi
nirbhaya rape case convict akshaykumar thakur filed curative petition in supreme court
निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या चारही दोषींना निर्धारित दिवशी आणि ठरलेल्या वेळी फाशी देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे. याप्रकरणी दोषींपैकी विनय शर्मा आणि मुकेश या दोघांनी सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली होती. यावर न्या. आर भानुमती आणि अशोक भूषण यांच्या ५ न्यायाधीशांच्या पिठाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे चारही दोषींना फासावर लटकवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार या प्रकरणातील चारही आरोपींना २२ जानेवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे.

दरम्यान दिल्ली न्यायालयाने यापूर्वी याप्रकरणी दोषींविरोधात डेथ वॉरंट जारी केलं होतं. त्यानुसार ७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता या चारही दोषींना फाशीची शिक्षा देण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते. मात्र, आरोपींच्या वकीलांनी आमच्या पक्षकारांना क्युरेटिव्ह याचिका दाखल करायची असल्याचा युक्तीवाद केला होता. त्यानुसार सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली. पण आज सुप्रीम कोर्टाने आरोपींची क्युरेटिव्ह याचिका फेटाळून लावली आहे.

हेही वाचा – निर्भयाच्या आरोपींना फासावर लटकवून जल्लाद मोडणार पणजोबांचा रेकॉर्ड