घरदेश-विदेशकाय म्हणता? ओला-उबर? निर्मला सीतारमण झाल्या तुफान ट्रोल!

काय म्हणता? ओला-उबर? निर्मला सीतारमण झाल्या तुफान ट्रोल!

Subscribe

ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मंदी येण्यासाठी ओला-उबर कारणीभूत असल्याचा अजब दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केला होता. त्यावर आता नेटिझन्सनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या मंदीबद्दल केलेल्या वक्तव्यावरून त्यांना नेटिझन्सनी चांगलंच ट्रोल केलं आहे. ‘ओला-उबरमुळेच ऑटोमोबाईल क्षेत्रात विक्रीमध्ये घट झाली आहे. लोकांनी खासगी वाहने खरेदी करण्यापेक्षा ओला-उबरला प्राधान्य दिल्यामुळेच खरेदी होत नाही’, असा दावा निर्मला सीतारमण यांनी केला आहे. त्यावर आता ट्वीटरवर ट्रोलिंगचा धुमाकूळ सुरू झाला आहे. काही ट्रोलर्सनी निर्मला सीतारमण यांना सल्ला दिला आहे, काहींनी ओला-उबरचं कौतुक केलं आहे, तर काहींनी निर्मला सीतारमण यांच्या लेखी असलेल्या ‘मिलियनेयर’ नागरिकांना सुनावलं आहे! काहींनी तर थेट निर्मला सीतारमण यांची राजीनाम्याची वेळ आल्याचं देखील म्हटलं आहे!


वाचा सविस्तर – ओला-उबरमुळेच ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदी! केंद्रीय अर्थमंत्र्यांचा अजब दावा!

- Advertisement -

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -