घरताज्या घडामोडीनितीश कुमारांनी केली प्रशांत किशोर यांची पक्षातून हकालपट्टी

नितीश कुमारांनी केली प्रशांत किशोर यांची पक्षातून हकालपट्टी

Subscribe

जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर आणि पवन के. वर्मा यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे जनता दल (यू)चे उपाध्यक्ष होते. जेडीयूचे मुख्य सरचिटणीस आणि राष्ट्रीय प्रवक्ते के.सी. त्यागी यांनी या कारवाईची माहिती दिली. प्रशांत किशोर यांच्यासोबत राज्यसभेचे खासदार पवन वर्मा यांची देखील हकालपट्टी करण्यात आलेली आहे. पक्षशिस्त मोडल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. प्रशांत किशोर हे गेल्या काही दिवसांपासून भाजपवर टीका करत होते. बिहारमध्ये भाजप आणि जदयू यांची युती आहे. तसेच प्रशांत किशोर यांनी पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार यांच्याविरोधात देखील वक्तव्ये केले असल्याचे त्यागी यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रशांत किशोर यांची हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी ट्विटरवर ट्विट करत पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. “धन्यवाद नितीश कुमार. बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कायम ठेवण्यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. ईश्वर तुमचे भले करो.” असे ट्विट त्यांनी केले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -