Corona: चिंता वाढली; कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यू रोखण्यात प्लाझ्मा थेरपी प्रभावी नाही

No benefit of plasma therapy in reducing Covid-19 mortality risk
Corona: चिंता वाढली; कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यू रोखण्यात प्लाझ्मा थेरपी प्रभावी नाही
Advertisement

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत कोरोना रोखण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहेत. दरम्यान कोरोनावरील उपचार म्हणून प्लाझ्मा थेरपी खूप प्रभावी मानली जाते. पण प्लाझ्मा थेरपी कोरोनाग्रस्त रुग्ण गंभीर होण्यापासून किंवा मृत्यू रोखण्यात प्रभावी नसल्याचे भारतीय वैद्यकीस संशोधन संस्थेच्या (ICMR) अभ्यासातून उघकीस आले आहे. या अभ्यासाबाबत अद्याप आयसीएमआरकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. पण मेड अर्काइव्ह या वैद्यकीय विषयक असलेल्या संकेतस्थळावर हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

मेड अर्काइव्ह संकेतस्थळावरील दिलेल्या माहितीनुसार, २२ एप्रिल ते १४ जुलै या दरम्यान देशातील ३९ खासगी आणि सरकारी रुग्णालयातील ४६३ रुग्णांवर हा अभ्यास केला. यामध्ये २३५ रुग्णांना प्लाझ्मा देण्यात आला आणि २२९ जणांवर प्रोटोकॉलनुसार उपचार करण्यात आले. यामध्ये संशोधनातील प्राथमिक निष्कर्षानुसार, प्लाझ्मा दिलेले ३४ (१३.६ टक्के) आणि इतर ३१ (१४.६ टक्के) रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. तसेच प्लाझ्मा दिलेल्या ७.२ टक्के रुग्णांची प्रकृती आणखी गंभीर होत गेली. तर प्लाझ्मा न दिलेल्या रुग्णांत हे प्रमाणे ७.४ टक्के इतके होते. तसेच सर्व रुग्णात मध्यम स्वरुपाची लक्षणे होती. या संशोधत सामील असलेल्या एका रुग्णालयातील डॉक्टरांनी याला दुजोरा दिला आहे.

दरम्यान कोरोनाग्रस्त रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी अधिक उपायकारक असल्यामुळे प्लाझ्मा बँकही तयार करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात प्लॅटिना प्रकल्पाअंतर्गत सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये बऱ्याच रुग्णांवर प्लाझ्मा दिला जात आहे. पण प्लाझ्मा थेरपी ही कोरोनाग्रस्त रुग्णांवरील उपचारासाठी कितपत प्रभावी ठरते, यासाठी आयसीएमआरकडून देशभरात चाचणी घेण्यात आली होती. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तामध्ये कोरोनाशी लढण्यासाठी अँटीबॉडी तयार होतात. यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा कोरोनाग्रस्त रुग्णाच्या शरीरात सोडले जातात आणि यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची प्रकृतीत सुधारते की नाही. ही गोष्ट या अभ्यासातून पाहण्यात येणार होती. पण या संशोधनामुळे कोरोनावरील उपचार म्हणून प्लाझ्मा थेरपीच्या उपायावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


हेही वाचा – सरकारने विमा कवच नाकारल्याने डॉक्टर संतप्त, राज ठाकरेंची घेतली भेट