घरदेश-विदेशअमेरिकेत इम्रान खान यांना दुय्यम वागणूक

अमेरिकेत इम्रान खान यांना दुय्यम वागणूक

Subscribe

इम्रान खान सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. मात्र अमेरिकेत त्यांना दुय्यम वागणूक मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी ते कतार एअरवेजच्या विमानाने अमेरिकेत दाखल झाले. परंतु, विमानतळावर इम्रान खान यांच्या स्वागतासाठी कोणतेही बडे नेते आलेले नव्हते. विशेष म्हणजे अमेरिकेत दुसऱ्या देशाचे प्रमुख आले तर त्या नेत्याचे जंगी स्वागत करण्याची परंपरा आहे. मात्र, इम्रान खान यांचे इतर देशाच्या राष्ट्राध्यक्षांप्रमाणे नेहमीप्रमाणे थाटात स्वागत करण्यात आले नाही. अमेरिकेच्या विमानतळावर इम्रान यांच्या स्वागतासाठी प्रोटोकॉल अधिकारी हा सर्वोच्च अधिकारी म्हणून उपस्थित होता. त्याचबरोबर अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. इम्रान यांच्यासोबत परराष्ट्र सचिव सोहेल महमूद आणि वाणिज्य अब्दुल रझ्झाक आहेत.

हेही वाचा – ICJ च्या निर्णयावर पाकचे पंतप्रधान इम्रान खानचे ट्वीट

- Advertisement -

इम्रान खान यांच्या अमेरिका दौऱ्यामागे काय कारण आहे?

पाकिस्तान सध्या प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. कारण अमेरिकेने आर्थिक साहाय्य थांबवले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान थेट अमेरिकेला गेले आहेत. तिथे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मदतीची याचना करणार आहेत. अमेरिकेकडून पाकिस्तानला आर्थिक मदत केली जायची. मात्र, १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानात तळ ठोकून असलेली दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने भारतीय जवानांवर पुलवामा येथे मोठा आत्मघातकी हल्ला घडवून आणला. या हल्लेनंतर भारताने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय राजकारणात एकटे पाडले. त्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवाद्याला खत घालणारा देश म्हणत सर्व आर्थिक मदत बंद केली. त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावली.


हेही वाचा – इम्रान खानला ईदी म्हणून सापाच्या कातड्याची चप्पल?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -