घरदेश-विदेशफटाक्यांवर सरसकट बंदी नाही - सर्वोच्च न्यायालय

फटाक्यांवर सरसकट बंदी नाही – सर्वोच्च न्यायालय

Subscribe

दिवाळीमध्ये फटाक्यांवर सरसकट बंदी नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच ज्यांच्याकडे परवाना आहे त्यांनाच फटाके विकता येणार आहेत.

फटाक्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. दिवाळीमध्ये फटाक्यांवर सरसकट बंदी नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच ज्यांच्याकडे परवाना आहे त्यांनाच फटाके विकता येणार आहे. पण, न्यायालयाने ऑनलाईन फटाके विक्रीवर मात्र बंदी घातली आहे. दरम्यान, फटाके फोडताना काळजी घेणे गरजेचे असून पर्यावरणाला हानी पोहोचवणारे फटाके फोडण्यावर न्यायालयानं बंदी घातली आहे. तर दिवाळी दरम्यान रात्री ८ ते १० वाजेपर्यंतच फटाके फोडता येणार आहेत. पण, ख्रिसमस आणि न्यू ईयरच्या रात्री १२ वाजेपर्यंत फटाके फोडण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे दिवाळी फटाके फोडता येणार की नाही? याबाबत असलेला संभ्रम आता दूर झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -