घरदेश-विदेश'बत्ती गुल' 'पैसा वसूल'; सरकारची नवी योजना

‘बत्ती गुल’ ‘पैसा वसूल’; सरकारची नवी योजना

Subscribe

यापुढे वारंवार 'बत्ती गुल' झाल्यास ग्राहकांना त्याचा लाभ होणार आहे.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वारंवार होणाऱ्या बत्ती गुलमुळे ग्रामीण भागातील जनतेला अंधारात दिवस काढावे लागतात. त्यामुळे वीज असून फायदा नसल्याची भावना ग्रामीण भागातील जनतेमध्ये निर्माण होते. पण आता वारंवार वीज गेल्यास काळजी करायचं कारण नाही. कारण जास्त वेळ घरातील वीज गेल्यास जनतेला त्याबद्दल पॅनल्टी देण्यात येणार आहे. केंद्र सरकार नवीन टॅरिफ धोरण तयार करत असून सर्व राज्यांनी हे धोरण मान्य केल्यास नागरिकांना या सुविधेचा फायदा होणार आहे.

स्मार्ट मीटर बसविणे बंधनकारक

केंद्रीय उर्जा मंत्रालयातर्फे नवीन धोरण तयार करण्यात येत असून याबाबत सर्व राज्यांची मते मागविण्यात आली आहेत. या धोरणानुसार प्रमाणापेक्षा जास्त वेळ वीज गेल्यास मंडळाला ग्राहकाला पॅनल्टी द्यावी लागणार आहे. पण हे धोरण लागू करण्यापूर्वी स्मार्ट मीटर लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे ज्या घरांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात येणार नाहीत, त्यांना या योजनेच्या लाभाला मुकावे लागणार. विशेष म्हणजे वीज बिलामधून पॅनल्टी कमी केली जाणार आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज चोरीच्या प्रकाराला आळा बसेल अशी आशा अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

चर्चेची पहिली फेरी पूर्ण

हे नवीन धोरण १ एप्रिलपासूनच लागू करण्यात येणार होते. मात्र काही राज्यांनी आक्षेप घेतल्याने योजना पुढे ढकलण्यात आली. या धोरणाबाबत केंद्र सरकारने सर्व राज्यांशी चर्चेची पहिली फेरी पूर्ण केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -