घरदेश-विदेशबेटी वही ब्याहेंगे, जिसके घर मे .... पायेंगे

बेटी वही ब्याहेंगे, जिसके घर मे …. पायेंगे

Subscribe

तुम्ही वधू शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता त्यांच्या घरातच मुलगी दिली जाणार आहे. त्यांच्या घरात ‘हे’ असणार आहे. आता नेमंक काय? हा प्रश्न पडला असेल ना? तुम्ही ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल तर आता अगदी त्या सिनेमाप्रमाणे घरी शौचालय नसेल तर तुम्हाला लग्नासाठी कोणतीही मुलगी मिळणार नाही. हरियाणामधल्या गोडीकान पंचायतीने घरात शौचालय असेल तरच मुलगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

नेमका काय आहे निर्णय?

ज्याच्या घरी शौचालय असेल, त्यालाच आम्ही आमची मुलगी देणार असा हरियाणामधल्या गोडीकान पंचायतने हा एकमताने निर्णय घेतला आहे. कारण हरियाणामधलील घराघरात शौचालय आहे. त्यामुळे मुलीचे लग्न करताना नवऱ्याच्या घरी शौचालय आहे की नाही ? हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. उघड्यावर शौचाला बसणे हे इतरांच्या आरोग्यासही हानीकारक आहे. म्हणूनच हा निर्णय घेतल्याचे या गावातील सरपंचाचे म्हणणे आहे.

- Advertisement -

निर्णयाचे लावले फलक

टॉयलेट एक प्रेमकथा या सिनेमाची प्रेरणा घेत गोडीकान पंचायतने हा निर्णय घेतला आहे. त्यांनी घेतलेला निर्णय अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच त्यांनी बॅनर तयार केले आहेत. त्यावर ‘बेटी वही ब्याहेंगे, जिसके घर मे शौचालय पायेंगे’ असे लिहिण्यात आले आहे. हरयाणामध्ये स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी आहे. मुळात स्त्रियांना म्हणावे तितके अधिकारही या ठिकाणी नाहीत. तरीदेखील गोडीकान सारख्या गावाने गावातील मुलींसाठी घेतलेला हा निर्णय मात्र कौतुकास्पद आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -