घरदेश-विदेशनोबेल शांतता पुरस्कार नादिया मुराद आणि डॉ. डेनिस मुकवेगे यांना जाहीर

नोबेल शांतता पुरस्कार नादिया मुराद आणि डॉ. डेनिस मुकवेगे यांना जाहीर

Subscribe

यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार नादिया मुराद आणि डॉ. डेनिस मुकवेगे यांना जाहीर झाला आहे. युद्धातील लैंगिक हिंसाचाराविरोधात केलेल्या कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.

सोमवारपासून सुरू झालेल्या नोबेल पुरस्कार २०१८ च्या यादीमध्ये आणखी दोन जणांच्या नावाचा समावेश झाला आहे. यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार नादिया मुराद आणि डॉ. डेनिस मुकवेगे यांना जाहीर झाला आहे. युद्धातील लैंगिक हिंसाचाराविरोधात केलेल्या कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. नादिया मुराद या स्वतः बलात्काराची शिकार ठरल्या असून त्या एक स्त्रीरोग तज्ज्ञ देखील आहेत. तर कांगोचे डॉ. मुकवेगे यांनी लैंगिक अत्याचाराविरोधातील लढाई लढतानाच जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी उल्लेखनीय काम केल्याने त्यांना सन्मानित करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

कोण आहेत पुरस्काराचे मानकरी

नादिया मुराद या इराकच्या असून त्या यजीदी या अल्पसंख्याक समाजातील आहेत. आयएस या दहशतवादी संघटनेने नादिया यांचं अपहरण केलं होतं. त्यांच्यावर या अतिरेक्यांनी अनेकवार बलात्कार करून त्यांचं शोषण केलं होतं. त्यांना आयएसची सेक्स स्लेव्हही म्हटलं जातं. या अतिरेक्यांच्या तावडीतून पळाल्यानंतर नादिया यांनी जगभरातील महिलांच्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडत जनजागृती करण्याचं काम केलं. तर डेनिस मुकवेगे हे मुळचे कांगोचे असून त्यांनी गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने युद्धातील लैंगिक हिंसाचाराविरोधात आवाज उठवला आहे. मुकवेगे हे स्त्रीरोग तज्ज्ञ असून त्यांनी लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या स्त्रीयांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं आहे.

एकूण ३३१ मधून नादिया – मुकवेगे यांची निवड 

नोबेल शांतता पुरस्कारासाठी यंदा ३३१ जणांची नावं आली होती. यामध्ये २१६ मान्यवर व्यक्तींची तर ११५ संघटनांची नाव होती. यामधून नादिया मुराद आणि डेनिस मुकवेगे यांच्या नावाची निवड करण्यात आली आङे. २०१६ मध्ये निवड समितीकडे ३७६ लोकांची नवा आली होती. आतापर्यंत ९८ जणांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. त्यात १०४ लोकांचा आणि २७ संघटनांचा समावेश आहे. या १०४ विजेत्यांमध्ये १६ स्त्रियांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -