Nobel Prize 2020 : अमेरिकन कवयित्री लुईस ग्लूक यांना साहित्यातील पुरस्कार जाहीर

यंदाचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार अमेरिकन कवयित्री लुईस ग्लूक यांना जाहीर करण्यात आला आहे. स्वीडीश अॅकेडमीने या पुरस्काराची घोषणा केली आहे. लुईस यांच्या अद्वितीय काव्य रचनेसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात येत असल्याचे नोबेल पुरस्कार समितीने जाहीर केले आहे. कवयित्री लुईस ग्लूक या येल विद्यापीठात इंग्रजीच्या प्राध्यापक आहेत. लुईस ग्लूक यांना याआधीदेखील अमेरिकेत साहित्यासाठी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लुईस यांना १९९३ मध्ये साहित्य विभागात पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर गेल्या वर्षी २०१९ मध्ये ऑस्ट्रियाचे वंशाचे लेखक पीटर हँडका यांनी साहित्यातील नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. नाविन्यपूर्ण लेखन तसेच भाषेतील नवीन प्रयोगाची दखल घेत त्यांना हा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.

नोबेल पुरस्कार जगभरात प्रतिष्ठेचा समजला जातो. हा पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो. डायनामाइटचा शोध लावणारे स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिले जातात. दरवर्षी त्यांच्या स्मृतीदिनी, १० डिसेंबर रोजी पुरस्कार प्रदान सोहळा होतो. वैद्यकशास्त्रासह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांती आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.

हेही वाचा –

‘परमबीर सिंग तुम्हाला गणवेश घालण्याचा अधिकार नाही’; ठाकरे – शरद पवारांवर अर्णबची आगपाखड