घरताज्या घडामोडीKim Jong-Un कोमात? बहिण सांभाळणार खुर्ची

Kim Jong-Un कोमात? बहिण सांभाळणार खुर्ची

Subscribe

काही दिवसांपासून उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्या गायब होण्याची बातमी प्रसार माध्यमांवर येत होती. त्यांचे निधन झाले असून त्यामुळे ते जगासमोर येत नसल्याचेही म्हटले जात होते. मात्र, काही दिवसांनी ते पुन्हा प्रसार माध्यमांसमोर आले. दरम्यान, पुन्हा एकदा एका एक्सपर्टने असा दावा केला आहे की, ‘उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन कोमात गेले असून त्यांची सत्ता आता त्यांची बहिण किम यो जोंग सांभाळणार आहे’.

किम जोंग उन यांचे निधन

दक्षिण कोरिया पूर्वचे राष्ट्रपती किम डे-जंगचे ऑफिसर चान्ग सॉन्ग-मिनने दावा केला आहे की, ‘किम जोंग हे कोमात गेले आहेत. तसेच या घटनेनंतर खूप कालावधी देखील गेला आहे. याबाबत पत्रकार रॉय कैलीने देखील दावा केला आहे की, ‘याठिकाणी मोठ्या प्रमाणात गोपनीयता ठेवली जाते. त्यामुळे या देशात नेमके काय चालू आहे, हे देखील कोणाला कळत नाही’. त्यांनी डेली एक्सप्रेसशी बोलताना म्हटले आहे की,’मला असं वाटतं की किम जोंगचा खरचं मृत्यू झाला आहे. पण, त्या देशाबाबत काहीच सांगू नाही शकत’.

- Advertisement -

बहिण सांभाळणार सत्ता

कैली पुढे म्हणतात की, ‘काही दिवसात खूप मोठा बदल होणार आहे. यापूर्वी देखील किम जोंग यांचे वडिल किम जोंग इल यांचे निधन झाले होते. त्यावेळी देखील त्यांच्या बाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती. जोपर्यंत त्यांचा मुलगा किम जोंग उन ती जबाबदारी सांभाळेल. त्याचप्रमाणे जोपर्यंत किम जोंग उन यांची बहिण त्यांची जबाबदारी सांभळू शकत नाही, तोपर्यंत किम जोंग उन यांच्याबाबत कोणतीही माहिती समोर येणार नाही.


हेही वाचा – मोरासोबत पंतप्रधान मोदींनी शेअर केला व्हिडिओ


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -