घरदेश-विदेशधमक्यांना घाबरत नाही - प्रकाश राज

धमक्यांना घाबरत नाही – प्रकाश राज

Subscribe

विशेष तपास पथकानं दिलेल्य माहितीच्या आधारे देण्यात आलेल्या वृत्तपत्रातील बातमी प्रकाश राज यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट केली आहे. या बातमीमध्ये गौरी लंकेशचे मारेकरी प्रकाश राज यांच्या हत्येचा कट करत आहेत असं सांगण्यात आलं आहे. यावर प्रकाश राजचं मत.

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रकाश राजला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या धमक्यांमागे पत्रकार गौरी लंकेशाचे मारेकरी असल्याचं म्हटलं जात आहे. यासंदर्भात प्रकाश राजने गुरुवारी गौरी लंकेशला मारलेल्या लोकांना मलाही मारायचं असून मी या धमक्यांना घाबरत नाही असं स्पष्ट केलं आहे. या धमक्यांमुळे माझा आवाज पहिल्यापेक्षा जास्त वाढेल आणि मी जास्त लढेन. अशा धमक्यांवर मला हसायला येत असून देशात लोकांमध्ये अशा गोष्टीमुळे घृणा निर्माण होत असल्याचंही प्रकाश राजनं सांगितलं आहे.

ट्विट करून दिली माहिती

विशेष तपास पथकानं दिलेल्य माहितीच्या आधारे देण्यात आलेल्या वृत्तपत्रातील बातमी प्रकाश राज यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट केली आहे. या बातमीमध्ये गौरी लंकेशचे मारेकरी प्रकाश राज यांच्या हत्येचा कट करत आहेत असं सांगण्यात आलं आहे. तर या बातमीवर प्रकाश राज यांनी आपलं मत ट्विट करून व्यक्त केलं. प्रकाश राजनं मोदी आणि भाजपावर केलेल्या जाहीर टीकेनंतर हा हत्येचा कट रचण्यात आल्याचं या बातमीमध्ये वृत्त देण्यात आलं आहे. त्यावर प्रकाश राजनं अजिबात घाबरत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, गौरी लंकेश हत्या प्रकरणातील पहिला मारेकरी केटी नवीन कुमारला अटक करण्यात आली असून नार्को टेस्टला सामोरं जाण्यास तो तयार झाला आहे. या व्यतिरिक्त आतापर्यंत सहा लोकांना अटक करण्यात आली असून नुकतंच परशुराम वाघमारेला अटक करण्यात आली आहे. ज्यांनं गौरी लंकेशवर गोळ्या झाडल्याचा संशय आहे.

- Advertisement -

तरूणांना निशाणा बनवण्याची प्रकाशला भीती

तरूणांमध्ये खोटा प्रचार चालू असल्यामुळं प्रकाश राज चिंतित आहे. तरूणांना त्यांच्या मार्गावरून भटकवण्याचं काम चालू असल्याचं मत प्रकाश राजनं मांडलं आहे. हे सगळं करण्याचं नक्की कारण काय? अशा धमक्यांमधून आपल्याला कळू शकत की, हे लोक किती निर्ढावलेले आहेत असंही त्यानं म्हटलं आहे.

- Advertisement -

न घाबरता काम करत राहणार

‘गौरी लंकेशच्या मारेकऱ्यांना मला मारायचे असले तरीही मी अजिबात घाबरणार नाही. मी न घाबरता माझं काम करत राहणार. या लोकांना वाटतं की, यांच्या राजकारणानं मी गप्प होईन पण असं मी होऊ देणार नाही.’ असं मत प्रकाश राजनं मांडलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -