घरदेश-विदेशडीटीएच सेवाही मोबाईल सिम कार्डप्रमाणे पोर्ट करता येणार

डीटीएच सेवाही मोबाईल सिम कार्डप्रमाणे पोर्ट करता येणार

Subscribe

मोबाईल सिम कार्डप्रमाणे आता डीटीएच सेवाही पोर्ट करता येणार असल्याचा खुलासा ट्रायच्या अध्यक्षांनी केला आहे.

‘ट्राय’च्या आदेशानुसार फक्त १५३ रुपयांत १०० चॅनेल्स ग्राहकांना घेता येणार आहेत. अर्थात या पॅकेमध्ये ग्राहकांना आपल्या पसंतीची चॅनेल निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. ग्राहक जितके चॅनेल निवडतील तेवढेच पैसे ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. तसेच एखाद्या ग्राहकाला कंपनी बदलण्याची इच्छ असल्यास त्या ग्राहकाला ती देखील मुभा देण्यात आली आहे. आता ग्राहक मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या सेवेवर नाखुश असल्यास ते सिम कार्ड पोर्ट करतो त्याप्रमाणे आता डीटीएच सेवाही पोर्ट करता येणार आहे. ट्राय याबाबत डीटीएच पोर्टींगची नवी योजना आणत आहे.

डीटीएच पोर्टींगची नवी योजना

ट्रायच्या अध्यक्षांनी एक नवी योजना आणण्याचा खुलासा केला आहे. या योजनेमध्ये आता डीटीएच सेवा देणाऱ्या कंपन्याही तोच सेट टॉपबॉक्स ठेवून सिमकार्टप्रमाणे डीटीएच सेवाही पोर्ट करता येणार आहे. ही योजना २०१९ हे वर्ष संपेपर्यंत लागू करण्यात येणार आहे. यानुसार ग्राहक सेटटॉप बॉक्स न बदलताच कंपन्यांची सेवा बदलू शकणार आहेत. यासाठी ग्राहकांना त्यांच्या सेट टॉप बॉक्समध्ये नवीन सॉफ्टवेअर अपडेट करावे लागणार आहे.

- Advertisement -

एसटीबीची सुरक्षा धोक्यात

एखादा ग्राहक नाखुश असल्यास तो नेटवर्क बदलू शकतो. यामुळे नेटवर्क बदलणे जरी सोपे होणार असले तरीही एसटीबीची सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे कंटेंटची नक्कल केली जाऊ शकते. ट्रायनुसार एसटीबीला प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर सारखे विकावे लागणार आहे. हे डीटीएच कंपन्यांना फारसे रुचणारे नसले तरीही ग्राहक त्यांच्या फायद्यानुसार कंपन्या बदलू शकणार आहेत. यामुळे या फटका कंपन्यांना बसणार आहे. याकरता कंपन्यांना चांगल्या ऑफर्स द्याव्या लागणार आहेत.


वाचा – ‘ट्राय’च्या नियमावलीला चॅनेल्सकडून छेद; ग्राहकांना थेट पॅकेजची सक्ती

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -