घरट्रेंडिंगआता शुद्ध ऑक्सिजन विकत घ्यावा लागणार!

आता शुद्ध ऑक्सिजन विकत घ्यावा लागणार!

Subscribe

दिल्लीतल्या साकेत परिसरातील 'ऑक्सि प्योर' नावाच्या ऑक्सिजन बारमध्ये २९९ रुपयांपासून पासून शुद्ध ऑक्सिजन विकत घेता येतो.

दिल्लीतल्या हवेतील प्रदूषण काही आठवड्यांपासून फारच वाढलेलं आहे. तेथील सगळ्या रहिवाशांना मास्क घालूनच घरा बाहेर पडावं लागत आहे. तर दर वर्षी वाढत चाललेल्या या प्रदूषणाचा फायदा घेत एका उद्योजकाने एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे. दिल्लीत जरी तुम्हाला शुद्ध हवा मिळत नसेल तरी दिल्लीच्या साकेत परिसरात असलेल्या ‘ऑक्सि प्योर’ नावाच्या ऑक्सिजन बारमध्ये २९९ रुपयांपासून शुद्ध ऑक्सिजन तुम्हाला विकत घेता येणार आहे. या जागेत तुम्हाला २९९ रुपये भरून १५ मिनिटांसाठी प्योर ऑक्सिजन दिला जातो. ७ वेगवेगळ्या सुगंधात शुद्ध ऑक्सिजन मिळतो.

ऑक्सिजन बार म्हणजे नक्की काय?

ऑक्सि प्योर हा बार मे २०१९मध्ये आर्यवीर कुमार यांनी लॉंच केला. या जागेवर फक्त शुद्ध ऑक्सिजन मिळतो. या जागेची खासियत म्हणजे या जागेवर ७ वेगवेगळ्या सुगंधात ऑक्सिजन उपलब्ध आहे. गवती चहा, संत्र, दालचिनी, लव्हेंडर, निलगिरी आणि पुदिना या फ्लेव्हरमध्ये सुद्ध ऑक्सिजन इथे मिळेल. ऑक्सि प्योरच्या स्टाफ हेडच्या सांगण्या प्रमाणे, ग्राहकाला एक ट्यूब देण्यात येते आणि त्यांना ट्यूबमधून शुद्ध ऑक्सिजनचा श्वास घ्यावा लागतो. ऑक्सि प्योरच्या वेबसाईट प्रमाणे ऑक्सि प्योरचे अनेक फायदे आहेत. हा ऑक्सिजन शरीराला ऊर्जा देतो आणि त्याशिवाय मनाला देखील शांत करतो. झोपेचे चक्र आणि पचनक्रिया देखील या ऑक्सिजनमुळे सुधारते. जरी या ऑक्सिजनचे अनेक फायदे असले तरी दिवसातून एकदाच या ऑक्सिजनचा लाभ घ्यावा असं तेथील कर्मचारी सांगतात.

- Advertisement -

सध्या हा ऑक्सिजन बार फक्त साकेत परिसरातील एका मॉलमध्ये असून डिसेंबरपर्यंत हा बार दिल्ली विमालतळात देखील सुरू करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -