घरदेश-विदेशरेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! IRCTCच्या नव्या सोयी-सुविधा

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! IRCTCच्या नव्या सोयी-सुविधा

Subscribe

IRCTCने ( इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशन ) प्रवाशांसाठी काही नव्या सोयी-सुविधा देऊ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये चार्ट तयार झाल्यानंतर सुद्धा तुम्ही ई-तिकिट रद्द करू शकणार आहात. तसेच प्रवाशाचे नाव बदलण्यापासून ते कॅब बुक करण्यापर्यंतच्या सुविधा देखील तुम्हाला देण्यात आल्या आहेत.

ऑनलाईन बदला बोर्डिंग स्टेशन

- Advertisement -

प्रवाशाच्या २४ तास अगोदर प्रवाशांना त्यांचे बोर्डिंग स्टेशन बदलता येणार आहे. IRCTCची वेबसाईट किंवा अॅपच्या मदतीने तुम्ही हे बदल करू शकता. एकदा बोर्डिंग स्टेशन बदलल्यानंतर मात्र तुम्ही तुमच्या मुळ बोर्डिंग स्टेशनवरून ट्रेन पकडू शकत नाही.

तिकिटावरचे नाव बदलण्याची सोय

- Advertisement -

एकदा ऑनलाईन तिकीट बुक केल्यानंतर प्रवाशाच्या नावात बदल करणे अशक्यच. पण, आता मात्र तुम्ही प्रवाशाच्या नावात देखील बदल करू शकणार आहात. म्हणजेच तुम्ही स्वत:च्या नावाने बुक केलेल्या तिकीटावर तुम्हाला भावाचे, आईचे किंवा मित्राचे नाव देता येणार आहे. प्रवाशाच्या २४ तास अगोदर तुम्ही हे बदल अगदी सजपणे करू शकता. जवळच्या तिकीट बुकिंग काऊंटरवर तुम्ही हा बदल करू शकता.

आयत्या वेळीही होणार तिकीट रद्द

चार्ट तयार झाल्यानंतर देखील तुम्ही तिकीट रद्द करू शकता. यापू्र्वी २४ तास अगोदर तिकीट रद्द करणे बंधनकारण होते. पण, आता मात्र प्रवाशाच्या काही वेळ अगोदर तिकीट रद्द करता येणार आहे. रेल्वेकडून काही कारणास्तव ट्रेन रद्द झाल्यास, ३ तासाहून ट्रेनला जास्त उशिर झाल्यास, एसीमध्ये बिघाड, आयडीकार्डशिवाय प्रवास यासारख्या कारणास्तव प्रवास रद्द झाल्यास तुम्ही तिकीट रद्द करू शकता.

ट्रेन रद्द झाल्यास पूर्ण पैसे परत

ट्रेन रद्द झाल्यास प्रवाशाला त्याचे पूर्ण पैसे परत केले जातील. ज्या अकाऊंटमधून तिकीटाचे पैसे डेबीट झाले होते त्याच अकाऊंटमध्ये पैसे डिपॉझिट केले जातील. पण, प्रवाशाने तिकीट रद्द केल्यास मात्र त्याला कॅन्सलेशनचे चार्जेस आकारले जातील.

ऑनलाईन करा कॅब बुकींग

आता तुम्ही IRCTCच्या वेबसाईटवरून किंवा अॅपवरून कॅब बुक करू शकता. त्यासाठी ओला आणि IRCTCमध्ये करार देखील करण्यात आला आहे. देशातल्या ११० शहरांमध्ये ही सुविधा पुरवली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -