आता कळणार व्हॉटसअॅप मेसेज किती वेळा फॉरवर्ड झाला

व्हॉटसअॅपवर मोठ्या प्रमाणात बोगस बातम्या वाऱ्यासारख्या पसरतात. या बातम्यांना आळा घालण्यासाठी व्हॉटसअॅपने गेल्या वर्षी ‘फॉरवर्डेड’ हा टॅग आणला असून आता व्हॉटसअॅप मेसेज किती वेळा फॉरवर्ड झाला हे देखील कळणार आहे.

Delhi
Now you know how many times your message has been forwarded

प्रत्येक जण आजकाल सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतं आणि त्यात सर्वात अधिक प्रमाणात वापरण्यात येणारे म्हणजे व्हॉटसअॅप. व्हॉटसअॅपचा वापर दिवसेंदिवस वाढत असल्याचे लक्षात घेऊन व्हॉटसअॅपने अनेक फीचर आणले आहेत. व्हॉटसअॅपने अलीकडेच फॉरवर्ड मेसेजचा टॅग हे फीचर दाखल केले आहे. या फीचरनुसार एखादा मेसेज नेमका किती जणांना फॉरवर्ड करण्यात आला याची माहिती मेसेज करणाऱ्यास मिळणार आहे. तुमच्या फोनमधील व्हॉटसअॅप अपडेट केले की, ही सुविधा तुमच्याही हाती दाखल होणार आहे.

‘फॉरवर्डेड’ टॅग

व्हॉटसअॅपवर मोठ्या प्रमाणात बोगस बातम्या वाऱ्यासारख्या पसरतात. या बातम्यांना आळा घालण्यासाठी व्हॉटसअॅपने गेल्या वर्षी ‘फॉरवर्डेड’ हा टॅग आणला आहे. त्याचबरोबर एखादी बातमी एकाच वेळी जास्तीत जास्त पाच जणांना फॉरवर्ड करता येईल, अशीही व्यवस्था केली आहे. त्याचा अनुकूल परिणाम दिसत असतानाच आता एखादी बातमी नेमकी किती जणांना फॉरवर्ड केली याचीही आकडेवारी फॉरवर्डिंग इन्फो या सेक्शनमध्ये मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत ही सोय फारच उपयुक्त ठरणार आहे.

हे आहेत नवीन फीचर्स

फेसबुककडे मालकी असलेल्या व्हॉटसअॅपने आता व्हॉटसअॅपवर अपलोड होणाऱ्या फोटोंची सत्यता तपासणे. तसेच आधीचे फोटो शोधण्याची सुविधा असे आणखी दोन नवे फीचर्स समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला असून त्याची चाचणी यशस्वीही झाली आहे.


वाचा – व्हॉट्सअॅप अपडेट! एका स्वाईपवर करा रिप्लाय


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here